Home /News /mumbai /

आणखी 2 साधूंची हत्या, आता भाजपमध्ये 'इतना सन्नाटा क्यों है भाई?', काँग्रेस नेत्याचा सवाल

आणखी 2 साधूंची हत्या, आता भाजपमध्ये 'इतना सन्नाटा क्यों है भाई?', काँग्रेस नेत्याचा सवाल

पालघर घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. आता बुलंदशहरातील घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अमित शहा यांनी फोन का केला नाही, असाही सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

मुंबई, 28 एप्रिल: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामध्ये दोन साधूंची गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील पालघरमध्ये चोर समजून दोन साधू आणि ड्रायव्हरची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे राज्यासह देशातील राजकीय वातावरणात ढवळून निघालं होतं. एवढं नाही तर या प्रकरणाला धार्मिक रंगही देण्यात आला होता. आता मात्र भाजपकडून कोणी काहीच बोलत नाही. म्हणून इतना सन्नाटा क्यों है भाई? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.  उत्तर प्रदेश आणि पालघरमधील साधू-संत वेगवेगळे आहेत का? असंही सावंत म्हणाले आहे. पालघरमध्ये अफवेमुळे दोन साधूंची हत्या झाली. त्याला भाजपकडून धार्मिक रंग देण्यात आला होता. पालघर घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. आता बुलंदशहरातील घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अमित शहा यांनी फोन का केला नाही, असाही सवाल सचिन सावंत यांनी केला आहे. हेही वाचा.. दरम्यान, आता उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात दोन साधूंची हत्या झाली. उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आहे. मग आता भाजपच्या गोटात इतका सन्नाटा का? असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजप वर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी अमानुष हत्येवरून व्यक्त केली चिंता.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोनवरून चर्चा केली.  अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये काही मद्यपींनी दोन साधूंची गळा आवळून हत्या केली आहे. साधूंकडील चिमटा चोरुन  नेल्याच्या तक्रारीमुळे काही मद्यपींनी हे दुहेरी हत्याकांड केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. अनुपशहर कोतवालीच्या पागोना गावात असलेल्या शिव मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. कंपाऊंड रूममध्ये दोघांचे मृतदेह अतिशय वाईट अवस्थेत सापडले आहेत. दोन्ही साधू शिवमंदिराची देखभाल करत आणि पुजार्‍याचं काम करतात. त्यांच्याकडील चिमटा नेल्याची तक्रार साधूने केल्यावर काही व्यसनी तरुणांनी त्यांचा खून केला. घटनेचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपीला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुरारी असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताचय त्यांनी घटनास्थळावरून दोन मृतदेह ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पालघरमध्येही दोन साधू आणि चालकाची जमावाने दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी 101 लोकांना अटकही करण्यात आली आहे. पालघरमधील डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज यांची जमावाने दगडाने ठेचून हत्या केल्याच्या घटनेनं अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Congress, Sachin sawant, Udhav thackeray, Uttar pradesh

पुढील बातम्या