माळशिरस, 13 जुलै: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस (Malshiras) याठिकाणी एका स्मशानभूमीत विवाहित महिलेवर अंत्यसंस्कार (Funeral) सुरू असताना पोलीस (Police) आल्यानं, नातेवाईकांनी जळती चिता सोडून घटना स्थळावरून पलायन (Relative run away) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिलेची हत्या केल्यानंतर तिनं आत्महत्या केल्याचा बनाव रचून नातेवाईकांनी रचला होता. पण चौकशीसाठी पोलीस स्मशानभूमीत येताचं आरोपी नातेवाईकांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. यानंतर पोलिसांनी जळती चिता विझवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. संबंधित महिलेची हत्या झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीसांनी चार आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. चारही जणांना अटक केली असून न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पल्लवी मनोज राऊत असं हत्या झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहेत. तर पती मनोज पांडुरंग राऊत, दीर श्रीकांत पांडुरंग राऊत, मृताची आई सुरेखा गौतम गवळी, भाऊ विशाल गौतम गवळी असं न्यायालयीन कोठडी मिळालेल्या चार आरोपींची नावं आहेत. हेही वाचा- एकटी मुलगी पाहून घरात शिरला अन्…; 3 तासांनी आरोपीनं गळफास घेत संपवलं जीवन संबंधित घटना 8 जुलै रोजी माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस याठिकाणी घडली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पत्नी पल्लवी आणि आरोपी पती मनोज राऊत यांच्यात मागील काही दिवसांपासून कौटुंबीक वाद होता. तर मागील दीड वर्षात त्यांच्या दोघांत अनेकदा कडाक्याची भांडणं झाली आहे. दरम्यान आरोपी पतीनं मृत पल्लवी यांना अनेकदा बेदम मारहाण देखील केली आहे. हेही वाचा- मित्रांना कॉल करत तरुणाची बाईकसह तलावात उडी; शेवटचे शब्द वाचून पाणवतील डोळे पतीच्या सततच्या मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून अलीकडेच पल्लवी यांनी घरात कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. काही दिवसांनी पल्लवीचा थांगपत्ता लागल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला परत आणलं होतं. परत आणल्यानंतरही त्यांच्यातील कलह कमी झाला नाही. यातून संशयित आरोपीनं पल्लवी यांना किरकोळ कारणातून बेदम मारहाण केली. यामध्ये पल्लवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हेही वाचा- दोन महिन्यातच संसार उद्धवस्त; सकाळी फिरायला गेली अन् पाचव्या दिवशी आढळला मृतदेह यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी, पीडितेनं आत्महत्या केल्याचा बनाव रचत कोणालाही न सांगता गुपचूप अंत्यसंस्कार उरकण्याचा प्लॅन केला. पण या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला. अंत्यसंस्कार सुरु असताना पोलीस आल्यानं आरोपींनी जळती चिता जाग्यावर सोडून घटनास्थळावरून पळ काढला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास माळशिरस पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.