मंठा, 13 जुलै: जालना (Jalna) जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातील एका तरुणानं मुलगी घरात एकटी असल्याचं पाहून जबरदस्तीनं तिच्याशी शारीरिक संबंध (sexual relation) ठेवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीनं आरोपीला विरोध करत घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केल्यानं आरोपीनं पीडित मुलीला कुऱ्हाडीच्या दांड्यानं मारहाण (Beat) केली आहे. मुलीला मारहाण केल्यानंतर घाबरलेल्या तरुणानं घटनेच्या तीन तासानंतर गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनं गावात एकच खळबळ उडाली आहे.
पवन तान्हाजी दांगट असं आत्महत्या केलेल्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मागील काही दिवसांपासून तो गावातील एका मुलीवर प्रेम करत होता. पण संबंधित मुलगी त्याला फारसा भाव देत नव्हती. त्यामुळे आरोपी पवन 11 जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास पीडित मुलीच्या घरात कुणी नसल्याचं पाहून तिच्या घरात शिरला. आरोपीनं घरात घुसून तिच्या अंगाला झटू लागला. 'मी किती दिवसांपासून तुझा पाठलाग करतोय, तरीही तू मला भाव देत नाही' म्हणत आरोपी पीडित मुलीचा हात पकडला.
हेही वाचा-Pune: मित्राला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला; हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा एजंट अटकेत
आरोपी पवननं पीडित मुलीशी जबरदस्ती करायला सुरुवात केली. त्यामुळे तिनं आरोपीच्या तावडीतून सुटका करून घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या पवननं पीडितेच्या घरातील कुऱ्हाडीच्या दांड्यानं पीडितेला बेदम मारहाण करायला केली. या घटनेत पीडित मुलगी गंभीर जखमी झाली.
हेही वाचा-मुंबईतील तरुणी बंगाली बाबाच्या जाळ्यात अडकली; लोकलमधील जाहिरात पाहून फोन केला अन
गावातील मुलीला मारहाण करून जखमी केल्यानं घाबरलेल्या आरोपीनं घटनेच्या तीन तासानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. मुलीच्या फिर्यादीवरून मंठा पोलिसांनी मृत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक राठोड करत आहेत. गावातील एका मुलीला कुऱ्हाडीच्या दांड्यानं मारहाण करून तरुणानं स्वतः आत्महत्या केल्यानं गावात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Marathwada, Sexual harassment