मराठी बातम्या /बातम्या /nagpur /मित्रांना कॉन्फरन्स कॉल करत तरुणाची बाईकसह तलावात उडी; शेवटचे शब्द वाचून पाणवतील डोळे

मित्रांना कॉन्फरन्स कॉल करत तरुणाची बाईकसह तलावात उडी; शेवटचे शब्द वाचून पाणवतील डोळे

Suicide in Nagpur: नागपूर मध्ये एका 19 वर्षीय तरुणानं आपल्या दुचाकीसह तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Suicide in Nagpur: नागपूर मध्ये एका 19 वर्षीय तरुणानं आपल्या दुचाकीसह तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Suicide in Nagpur: नागपूर मध्ये एका 19 वर्षीय तरुणानं आपल्या दुचाकीसह तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नागपूर, 13 जुलै: नागपूर (Nagpur) मध्ये एका 19 वर्षीय तरुणानं आपल्या दुचाकीसह तलावात उडी (Jump into lake with bike) घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या काही मित्रांना कॉन्फरन्स कॉल (Conference call with friends)करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती. तसेच आपल्या आईची काळजी घ्या असंही मृत तरुणानं आपल्या मित्रांना सांगितलं होतं. संबंधित तरुण आत्महत्या करणार असल्याची माहिती मित्रांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला आहे. संबंधित मुलानं दुचाकीवर बसून भरधाव वेगात येत फुटाळा तलावात उडी मारली आहे. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अथर्व राजू आनंदेवार असं आत्महत्या करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचं नाव असून  तो पॉलिटेक्निकचा पहिल्या वर्षात शिकत होता. सोमवारी दुपारी ही थरारक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. हसत्या खेळत्या मुलानं अशा प्रकारे आत्महत्या केल्यानं आनंदेवार कुटुंबीयांची पायाखालची जमीनच सरकली आहे. मृत अथर्वला एक मोठा भाऊ असून तो एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. तर वडील टाईल्स कंपनीत कामाला आहेत.

हेही वाचा-3 जणांची हत्या केल्यानंतर तरुणाची आत्महत्या; 2 दिवसात भावाचीही सापडली सुसाइड नोट

खरंतर, सोमवारी सकाळपासूनच अथर्व काहीसा तणावात होता. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यानं आपल्या तीन मित्रांना कॉन्फरन्स कॉल लावला आणि आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. यावेळी अथर्वनं मित्रांशी बोलताना सांगितलं की, 'मी आत्महत्या करतोय माझ्या आईकडं लक्ष द्या'. असं बोलल्यानंतर मित्रांनाही धक्का बसला. मित्रांना त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानं कोणाचही न ऐकता आपल्या दुचाकीसह तलावात उडी मारली.

हेही वाचा-दोन महिन्यातच संसार उद्धवस्त; सकाळी फिरायला गेली अन् पाचव्या दिवशी आढळला मृतदेह

या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर, त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत फुटाळा तलावात शोध मोहीम राबवली. काही वेळानं अथर्वचा मृतदेह आणि बाइक बाहेर काढण्यात आली आहे. पोलिसांनी अथर्वचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अथर्वनं आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी केली, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Crime news, Nagpur, Suicide