मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

वसई: दोन महिन्यातच संसार उद्धवस्त; सकाळी फिरायला गेली अन् पाचव्या दिवशी समुद्रात आढळला मृतदेह

वसई: दोन महिन्यातच संसार उद्धवस्त; सकाळी फिरायला गेली अन् पाचव्या दिवशी समुद्रात आढळला मृतदेह

Crime in Mumbai: पाच दिवसांपासून बेपत्ता (Missing from 5 days) असलेल्या नालासोपाऱ्यातील (Nalasopara) 30 वर्षीय विवाहितेचा (Married woman) मृतदेह वसई (Vasai) येथे समुद्रकिनारी (Found died) आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

  • Published by:  News18 Desk

वसई, 13 जुलै: पाच दिवसांपासून बेपत्ता (Missing from 5 days) असलेल्या नालासोपाऱ्यातील (Nalasopara) 30 वर्षीय विवाहितेचा (Married woman) मृतदेह वसई (Vasai) येथे समुद्रकिनारी (Found died) आढळल्यानं खळबळ उडाली आहे. समुद्राच्या पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. पण कुटुंबीयांनी मृत महिलेसोबत काहीतरी घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ममता पटेल असं मृतावस्थेत आढळलेल्या 30 वर्षीय विवाहित महिलेचं नाव असून त्यांचा दोन महिन्यांपूर्वी नालासोपाऱ्यातील मेहुल पटेल याच्याशी विवाह झाला होता. मृत ममता आपल्या पती आणि कुटुंबासोबत सोबत नालासोपाऱ्यातील एव्हरशाइन नगर परिसरात वास्तव्याला होत्या. दरम्यान बुधवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास त्या सकाळी फिरण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. पण सायंकाळ झाली तरीही त्या घरी परत आल्या नाहीत. यामुळे चिंतेत असलेल्या सासरच्या मंडळींनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा-VIDEO :पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार, लहान मुलासमोर तरुणाची धारदार कोयत्याने हत्या

ममता यांचा शोध सुरू असताना, बेपत्ता झाल्याच्या पाचव्या दिवशी त्यांचा मृतदेह वसई पश्चिमेच्या किल्लाबंदर समुद्रकिनारी आढळला. ममता यांनी आत्महत्या केली हत्या करण्यात आली, याबाबत कोणताही पुरावा अद्याप पोलिसांकडे नाहीये. पण कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. ममता यांनी स्वतःच्या मर्जीनं दोन महिन्यापूर्वी विवाह केला होता. त्यामुळे ती आत्महत्या करणं शक्य असल्याचं मृताच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.

हेही वाचा-मुंबईतील तरुणी बंगाली बाबाच्या जाळ्यात अडकली; लोकलमधील जाहिरात पाहून फोन केला अन

विशेष म्हणजे रविवारी सकाळी मृत ममता यांचा फोन सुरू होता. त्यामुळे या प्रकरणामागे काहीतरी काळंबेर असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. शिवाय ममता या नासासोपाऱ्या परिसरात नवीन होत्या. त्यामुळे नालासोपाऱ्यातून त्या वसई याठिकाणी एवढ्या लांब कशा काय पोहोचल्या? याबाबतही शंका उपस्थित करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सर्व अंगाने तपास केला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Death, Vasai