• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • राष्ट्रवादीच्या परभणी जिल्हा कार्यालयावर दगडफेक, शिवसेना खासदाराच्या राजीनामा नाट्यानंतरची घटना

राष्ट्रवादीच्या परभणी जिल्हा कार्यालयावर दगडफेक, शिवसेना खासदाराच्या राजीनामा नाट्यानंतरची घटना

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

  • Share this:
परभणी 26 ऑगस्ट: राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी येथील जिल्हा कार्यालयावर, अज्ञात इसमाकडून दगडफेकीची घटना घडल्या असून, या घटनेमध्ये पक्षाच्या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. वसमत रोडवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. यामध्ये समोरच्या बाजूला असलेल्या काचांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  दुपारपासूनच, जिल्ह्यातील राजकारणामध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत राजीनामा दिला. त्यानंतर ही घटना घडल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा पाठवला आहे. त्या पत्रात त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीला झुकतं माप मिळत आहे. शिवसैनिकांना डावललं जात आहे. राष्ट्रवादीमुळे शिवसैनिकांवर अन्याय होत आहे असा आरोप केला होता. त्यानंतरच ही दगडफेकीची घटना घडल्याने त्याचा संदर्भ या घटनेमागे असल्याची चर्चा आहे. काही तरुण मोटरसायकलवर आले आणि त्यांनी दगडफेक केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात राष्ट्रवादी कार्यालयाच्या दर्शनी भागात असलेल्या काचा फुटल्या आहेत. रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली. राष्ट्रवादीवर आरोप करत शिवसेनेच्या खासदाराचा राजीनामा, उद्धव ठाकरेंना दिलं पत्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दिली असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचं काम सुरु होतं. काय आहे राजीनामा प्रकरण? सत्तेत असुनही काम होत नाहीत, त्यामुळे खासदारकी काय कामाची. फक्त राष्ट्रवादीचीच कामे होतात असा आरोप करत शिवसेनेच्या खासदाराने बुधवारी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राजीनाम्याचं पत्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. त्यात त्यांनी राजीनाम्याचं कारण सविस्तर सांगितलं आहे. त्यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी अद्याप स्वीकारलेला नाही. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचं अशासकीय मंडळ नियुक्त करण्यासाठी पाठपुरावा करूनही काहीही झालं नाही. त्यामुळे राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बीडमधून धक्कादायक बातमी, कोरोनाच्या समूह संसर्गाची घटना समोर! सरकारमध्ये असूनही काम होत नाही या अस्वस्थेतून बंडु जाधव यांनी हा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम होत नसल्याची शिवसैनिकांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेचा पुरेपूर वापर करत आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि कार्यकर्त्यांना ताकद देत आहे. असंही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published: