मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बीडमधून धक्कादायक बातमी, कोरोनाच्या समूह संसर्गाची घटना समोर!

बीडमधून धक्कादायक बातमी, कोरोनाच्या समूह संसर्गाची घटना समोर!


बीड जिल्ह्यातील कारागृह हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. कारण, एकाच दिवशी 59 कैदी हे कोरोना  पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

बीड जिल्ह्यातील कारागृह हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. कारण, एकाच दिवशी 59 कैदी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

बीड जिल्ह्यातील कारागृह हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. कारण, एकाच दिवशी 59 कैदी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

बीड, 24 ऑगस्ट : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यालाही कोरोनाचा विळखा बसला आहे. धक्कादायक म्हणजे, बीडच्या कारागृहात एकाच वेळी 59 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील कारागृह हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. कारण, एकाच दिवशी 59 कैदी हे कोरोना  पॉझिटिव्ह आढळून आले आहे. एकाच वेळी कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. या सर्व कैद्यांना वेगळे ठेवण्यात आले होते. कारागृहात नेण्याअगोदर आरोपींना वेगळे ठेवले जात असते. त्यानंतर कोरोनाची चाचणी केली जाते. जर रिपोर्ट निगेटिव्ह आढळला तरच कारागृहात दाखल केले जाते. पण, पर्यायी व्यवस्था असूनही एकाच वेळी 59 कैद्यांना कोरोनाची लागण कशी झाली, असा सवाल उपस्थितीत झाला आहे. सप्टेंबरमध्ये लॉकडाउन कायमचा हटवणार? ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय काही दिवसांपूर्वीच कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी झाली होती. त्यात सर्वजण हे निगेटिव्ह आढळले होते. त्यामुळे रविवारी कोरोनाची चाचणी करण्यात आली नव्हती, अशी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 128 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या 7 लाख गाठणार दरम्यान, राज्यात रविवारी 10,441 नवे रुग्ण आढळून आलेत तर 258 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 6,82,383 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 4,88,271 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 1,71,542 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा 71.55 एवढा झाला आहे. तर मृत्यू दर हा 3.26 एवढा आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: बीड

पुढील बातम्या