राष्ट्रवादीवर आरोप करत शिवसेनेच्या खासदाराचा राजीनामा, उद्धव ठाकरेंना पाठवलं पत्र

राष्ट्रवादीवर आरोप करत शिवसेनेच्या खासदाराचा राजीनामा, उद्धव ठाकरेंना पाठवलं पत्र

फक्त राष्ट्रवादीचीच कामे होतात असा आरोप करत शिवसेनेच्या खासदाराने बुधवारी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

औरंगाबाद 26 ऑगस्ट: सत्तेत असुनही काम होत नाहीत, त्यामुळे खासदारकी काय कामाची. फक्त राष्ट्रवादीचीच कामे होतात असा आरोप करत शिवसेनेच्या खासदाराने बुधवारी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राजीनाम्याचं पत्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. त्यात त्यांनी राजीनाम्याचं कारण सविस्तर सांगितलं आहे.

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचं अशासकीय मंडळ नियुक्त करण्यासाठी पाठपुरावा करूनही काहीही झालं नाही. त्यामुळे राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारमध्ये असूनही काम होत नाही या अस्वस्थेतून बंडु जाधव यांनी हा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम होत नसल्याची शिवसैनिकांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेचा पुरेपूर वापर करत आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि कार्यकर्त्यांना ताकद देत आहे. असंही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांची अखेर बदली, अनेक बड्या अधिकाऱ्यांनाही हलवलं

सत्तेत तीन पक्ष असले तरी वर्चस्व मात्र हे फक्त राष्ट्रवादीचं असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना खासदाराच्या राजीनाम्यामुळे त्याला बळ मिळाल्याचं म्हटलं जात आहे. शिवसैनिकांना न्याय देता येत नसल्याने खासदारकी काय कामाची आहे. त्यामुळे पूर्ण विचारांती स्वेच्छेने मी राजीनामा देत आहे. मी साधा शिवसैनिक म्हणून काम करेल असंही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

सर्व अधिकार एकाच्या हातात..मग राज्यांचा अर्थ काय? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

दरम्यान, या राजीनामा पत्रानंतर शिवसेनेत जोरदार हालचाली सुरु झाल्या असून जाधव यांचं मन वळविण्याचाही प्रयत्न होत आहे.  सत्तेतली महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादीकडे असून कार्यकर्त्यांना झुकतं माप देत असल्याने काँग्रेस आणि शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 26, 2020, 5:56 PM IST
Tags: shivsena

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading