पंकजा मुंडेंकडे आठशे कोटींचा दारुचा कारखाना, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

पंकजा मुंडेंकडे आठशे कोटींचा दारुचा कारखाना, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

त्यांच्याकडे औरंगाबादला दारुचा कारखाना आहे. हा दारुचा कारखाना साधा सुध्दा नाही आठशे कोटींचा आहे. मग काय कमी आहे का?

  • Share this:

सुरेश जाधव, परळी 11 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांची तारीख जवळ येत असल्याने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बीड जिल्ह्यात जोरदार संघर्ष होत असून मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. परळीत झालेल्या बंजारा समाजाच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, आमच्या बहिणाबाईकडे काहीही कमी नाही. त्यांच्याकडे औरंगाबादला दारुचा कारखाना आहे. हा दारुचा कारखाना साधा सुध्दा नाही आठशे कोटींचा आहे. मग काय कमी आहे का? असा सवाल त्यांनी केला. एवढी श्रीमंती असताना शेतकऱ्यांचे पैसे कशाला ठेवता असा सवाल त्यांनी पंकजा मुंडे यांना केला. धनंजय मुंडे यांच्या या आरोपावर पंकजा मुंडे यांनी अजुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्या या आरोपांना काय उत्तर देतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

अखेर जमणार ! 'युती'ची घोषणा सात दिवसांमध्ये होणार

उद्या येणाऱ्या निवडणुकीत तेच पैशे खर्च केले जातील. त्यांनी अर्धे पैसे लोकसभेला खर्च केले राहिलेले विधानसभेसाठी खर्च करतील अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. परळी विधानसभा मतदार संघातील बंजारा समाज बांधवांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाज उपस्थित होता.

पुढे बोलतांना धनंजय मुंडें म्हणाले की पंकजा मुंडे सहा आठ इथे येतात. येऊन बचत गटाच्या महिलांना नादी लावले जाते, दुष्काळात गायी वाटल्या जात आहेत. गायी चारा आणि खुराक , निघालेलें दूध याचा ताळमेळ बसत नसताना त्यांत दुधाला भाव कमी आहे. दुष्काळात खायला चारा नाही आणि गायी वाटप सुरु आहे. मायबाप शेतकऱ्याला आहे ती जनावरं संभाळनं होतं नाही. त्याला आगोदर चारा  द्या असे म्हणत बिसलरीच्या पाणी बॉटल ची किंमत जास्त आहे मात्र दुधाचा भाव  कमी त्यामुळे आगोदर दुधाचा भाव वाढवा अशी मागणीही धनंजय मुंडें यांनी केली.

विधानसभेत मनसे स्वतंत्र लढणार? उमेदवारीसाठी 'ही' 26 नावं आघाडीवर

ते पुढे म्हणाले, पंकजा मुंडेंना शेतकऱ्यांचे जीवन कळलंच नाही त्या फक्त निवडणुकीपुरतंच इथं येतात. समाज सेवा कशी करायची ते गोपीनाथ मुंडें साहेबांनी आणि स्व. पंडित अण्णांनी मला शिकवलं कारण मी त्यांच्यासोबत सावली सारखा होतो आमच्या बहीण बाईं नाही. तीच परंपरांना चालवायची म्हणून आशीर्वाद द्या. सत्तेत असून एकही उद्योग नाही आणला तसेच पावनभूमी क्रांतीस्थळ परळी येथील बारा ज्योतिर्लिंग वैद्यनाथ देवस्थानचा ज्योतिर्लिगचा दर्जा केंद्र सरकारने काढून टाकला. त्यावेळी आमच्या खासदार ताई  कुठे होत्या. देव पळवून नेला तरी आमच्या बहीणबाई झोपलेल्या होत्या असा टोला धनंजय मुंडें यांनी लगावला.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 11, 2019, 4:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading