मुंबई, 11 सप्टेंबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करू शकते, असं बोललं जात होतं. मात्र आता मनसे या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इतर मित्रपक्षांसह मनसेलाही सोबत घेऊन महाआघाडीद्वारे शिवसेना-भाजपचा सामना करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र मनसे आता स्वतंत्र चूल मांडणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आधीच बॅकफूटवर असलेल्या आघाडीला आणखी एक धक्का धक्का बसला आहे. मनसेच्या पहिल्या टप्यातील संभाव्य उमेदवारांची यादी 1. शिवडी - आदीत्य शिरोडकर 2. भायखळा - संजय नाईक 3. वरळी - संतोष धुरी 4. माहीम - नितीन सरदेसाई 5. विले पार्ले - संदीप दळवी 6. मागाठणे - नयन कदम 7. कलिना - संजय तुर्डे 8. घाटकोपर - गणेश जुग्गल 9. भांडुप - अनिषा माजगावकर 10. विक्रोळी - नितीन नांदगावकर 11. ठाणे - अविनाश जाधव 12. कल्याण - प्रकाश भोईर 13. कल्याण ग्रामीण - प्रमोद (राजू) पाटील 14.डोंबिवली - राजेश कदम 15. नाशिक - राहुल ढिकले 16. नाशिक - अशोक मुर्तडक 17. नाशिक - सलिम शेख 18. पुणे - वसंत मोरे 19. वणी - राजु उंबरकर 20. पंढरपूर - दिलीप धोञे 21. पैठण - विजय चव्हाण 22. लातुर - संतोष नागरगोजे 23. हिंगोली - बंडू कुटे 24. खेड - वैभव खेडेकर 25. नागपूर - अजित वानखेडे 26. पुरंदर - बाबा जाधवराव दरम्यान, मनसेकडून अद्याप आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढल्यास नक्की कुणाचं गणित बिघडवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. VIDEO : भाजप प्रवेशाआधी हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.