मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंतप्रधान मोदींना पुण्यात अडवणार, मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतला मोठा निर्णय

पंतप्रधान मोदींना पुण्यात अडवणार, मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतला मोठा निर्णय

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार गंभीर नाही...

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार गंभीर नाही...

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार गंभीर नाही...

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई, 26 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे येत्या शनिवारी 28 नोव्हेंबरला पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान या दौऱ्यात पुण्यातीस सीरम इन्स्टिट्युटला (Serum Institute Pune)भेट देणार आहेत. कोरोना लसीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ते समजून घेणार आहेत.

दुसरीकडे, मात्र या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चानं (Maratha Kranti Thok Morcha) मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग अडवणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील (Aabasaheb Patil) यांनी दिली आहे.

हेही वाचा...वीज बिल भरु नका! राज ठाकरेंची गर्जना, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला केलं आवाहन

आबासाहेब पाटील म्हणाले, पुणे दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडवून मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून एल्गार करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार गंभीर नसल्याचा आरोप आबासाहेब पाटील यांनी केला आहे.

मराठा समाजाला राज्याच्या आणि केंद्राच्याही सुविधा मिळत नाही आहेत. मराठा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय कधीपर्यंत सहन करणार? शासकीय सेवेत आणि शिक्षणात मराठा समाजाला डावललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लसीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात येत आहेत. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या व्यथा समजून घ्याव्यात, मराठा समाजाचा आढावा घ्यावा, म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुण्यात मोदींचा मार्ग अडवून भेट घेणार असल्याचं आबासाहेब पाटील यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर चार डिसेंबरला 100 देशांचे राजदूत देखील सीरम इनस्टीट्युटला भेट देऊन तिथं सुरू असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत.

असा असेल पंतप्रधानांचा पुणे दौरा...

28 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजून 25 मिनिटांला अहमदाबाहून पुणे विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरूनच ते थेट सीरम इनस्टिट्यूटला हेलिकॉप्टरनं रवाना होतील. दुपारी 1 वाजून 05 मिनिटं ते 2 वाजून 05 मिनिटं या एक तासांच्या कालावधीत ते सीरम इनस्टिट्यूटला भेट देतील. संबंधित अधिकाऱ्यांकडून कोरोना लसीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतील. नंतर ते पुन्हा विमानतळाकडे रवाना होतील. दुपारी 2 वाजून 45 मिनिटांला पुणे विमानतळावरून तेलंगाणाकडे रवाना होतील.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसची निर्मितीचं काम तिसऱ्या टप्प्यात सुरू आहे. त्यामुळे या लसीकडे संपूर्ण देशासह जगाचे लक्ष लागलं आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनानं तयारी सुरू केल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

हेही वाचा...मनसे मोर्चाला हिंसक वळण, वीज कार्यालयाची तोडफोड, अभियंत्याच्या कॅबिनचीही नासधूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या दौऱ्यात इतर काही देशांचे राजदूतही सहभागी होण्याची शक्यता होती. मात्र, 100 देशांचे राजदूत 4 डिसेंबर रोजी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.

First published:

Tags: Maharashtra, Maratha kranti morcha, Maratha reservation, Pm narendra mdi, Protest for maratha reservation, Pune, मराठा आरक्षण maratha aarakshan