पाचवड, 13 ऑगस्ट: सातारा (Satara) जिल्ह्यातील पाचवड येथे एका विवाहित महिलेची हत्या (Married Woman Murder) करून फरार झालेल्या आरोपीच्या पोलिसांनी बेळगावातून मुसक्या आवळल्या (Accused arrest) आहेत. प्रेयसीच्या हत्याप्रकरणात चौकशी सुरू असताना, आरोपीनं 2019 साली पत्नीचीही हत्या (Wife Murder) केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसही हैराण झाले आहेत. पोलीस सध्या आरोपीच्या पत्नीचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस दोन्ही गुन्ह्यांचा तपास करत आहेत.
नितीन आनंदराव गोळे असं 38 वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्यानं 2019 मध्ये आपली पत्नी मनिषा नितीन गोळे (वय-34) हिची हत्या केली होती. यानंतर आरोपीनं आपल्या विवाहित प्रेयसीची देखील हत्या केली आहे. आरोपी नितीनने पोलिसांना गुंगारा देऊन बेळगावात पळ काढला होता. पण पोलिसांनी आरोपीचा माग काढत 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी अटक केली आहे. संध्या विजय शिंदे असं हत्या झालेल्या प्रेयसीचं नावं आहे.
हेही वाचा-अमरावती शहरात एकाच दिवशी दुहेरी हत्याकांड; नागरिकांमध्ये दहशत
नेमकं काय घडलं?
मृत प्रेयसी संध्या शिंदे 31 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली होती. यानंतर नातेवाईकांनी या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात केली होती. दरम्यान बेपत्ता झाल्यानंतर चौथ्या दिवशी 3 ऑगस्ट रोजी संध्या यांच्या मृतदेह भुइंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उसाच्या शेतीत आढळून आला. मृतदेहाजवळ आढळलेल्या आधारकार्डनुसार मृत महिलेची पोलिसांनी ओळख पटवली. संध्या यांचे बांधलेले हात आणि चेहऱ्यावरील जखमा पाहाता ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी तपासही सुरू केला.
हेही वाचा-फेसबुकवरची ‘सपना’ निघाली प्रत्यक्षातला ‘योगराज’, केली शारीरिक संबंधांची मागणी
पण बुधवारी, 4 ऑगस्ट रोजी संध्या यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर, नातेवाईकांनी भुइंज पोलीस ठाण्यात आरोपी नितीन गोळे यानेच संध्या यांची हत्या केल्याची फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी मोबाइल लोकेशन्सच्या आधारे आरोपी गोळेचा तपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीनं पोलिसांना गुंगारा देत कर्नाटकात पलायन केलं. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अत्यंत शिताफीनं पोलिसांनी आरोपी नितीन गोळे याला बेळगावातून अटक केली आहे.
हेही वाचा-कॉलेजमधली मैत्रीण आवडायची; लग्नाला मात्र दिला नकार, तर तरुणाने घेतला गळफास
याप्रकरणी तपास सुरू असताना आरोपीनं 2019 साली आपली पत्नी मनिषा नितीन गोळे हिची देखील हत्या केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीस सध्या मनिषा यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. 1 मे 2019 रोजी आरोपीनं पत्नी मनिषा यांची हत्या करून त्यांचा मृतदेह वैराटगडाच्या पायथ्याशी पुरल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. आरोपीनं कबुली जबाबात दिलेल्या माहितीनुसार पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Satara