जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Facebook वरची ‘सपना’ निघाली प्रत्यक्षातला ‘योगराज’, शारीरिक संबंधांच्या मागणीसह खुनाची धमकी

Facebook वरची ‘सपना’ निघाली प्रत्यक्षातला ‘योगराज’, शारीरिक संबंधांच्या मागणीसह खुनाची धमकी

Facebook वरची ‘सपना’ निघाली प्रत्यक्षातला ‘योगराज’, शारीरिक संबंधांच्या मागणीसह खुनाची धमकी

फेसबुकवर (Facebook) सपना (Sapna) नावाच्या प्रोफाईलशी झालेली मैत्री एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंदिगढ, 12 ऑगस्ट : फेसबुकवर (Facebook) सपना (Sapna) नावाच्या प्रोफाईलशी झालेली मैत्री एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. मैत्रीच्या बहाण्यानं गप्पागोष्टी वाढत गेल्यानंतर जेव्हा या तरुणीनं आपला नंबर (Mobile number) सपनाशी शेअर केला, तेव्हा प्रत्यक्षात ही सपना नसून योगीराज (Yogiraj) नावाचा मनुष्य असल्याचं तिच्या लक्षात आलं. योगीराजनं सुरु केलेलं ब्लॅकमेलिंग पाहिल्यावर तर या तरुणीच्या मानसिक स्वास्थ्यावरच त्याचा परिणाम झाला. अशी झाली ओळख हरियाणातल्या आझाद नगर भागात राहणाऱ्या एका 26 वर्षांच्या तरुणीला फेसबुकवर सपना नावाच्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने फारशी खातरजमा न करता ती स्विकारली. त्यानंतर दोघींमध्ये चॅटिंगला सुरुवात झाली. सपना तिच्या कुटुंबाविषयी आणि सुखदुःखाविषयी मोकळेपणाने बोलत असल्याचं लक्षात आल्यावर या तरुणीनेही स्वतःविषयीची माहिती द्यायला सुरुवात केली. काही दिवसांनी तिने सपनासोबत स्वतःचा मोबाईल नंबर शेअर केला. सपनाचा मोबाईल नंबर मिळाल्यानंतर तो तपासून पाहिला असता, प्रत्यक्षात तो नंबर लुधियानाच्या योगराज नावाच्या व्यक्तीचा असल्याचं तरुणीच्या लक्षात आलं. मात्र तोपर्यंत या तरुणीनं स्वतःविषयी आणि स्वतःच्या कुटंबाविषयी बरीच गोपनीय आणि संवेदनशील माहिती सपनाशी म्हणजेच योगराजशी शेअर केली होती. हे वाचा - VIDEO - तरुणीने दाखवला असा हिसका; ढोलेशोले दाखवणाऱ्या तरुणाची हवा टाईट ब्लॅकमेलिंग सुरू योगराजनं या तरुणीला पोन करून तिच्याकडं पैशांची आणि शरीरसुखाची मागणी करायला सुरुवात केली. त्याला नकार दिल्यानंतर तर तो चक्क घरी येऊन धडकला आणि घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गेला. आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर बलात्कार करण्याची आणि पती-मुलांना ठार करण्याची धमकीही त्याने दिली. या प्रकाराने हादरलेल्या तरुणीनं एकदा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यातून ती थोडक्यात बचावली. त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीनं तिनं योगराजविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी योगराजचा शोध सुरू केला आहे. फेसबुकवर किंवा इतर सोशल मीडियावर झालेल्या ओळखीच्या आधारे इतरांसोबत वैयक्तिक तपशील शेअर करताना सावध राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात