मराठी बातम्या /बातम्या /nagpur /अमरावती शहरात एकाच दिवशी दुहेरी हत्याकांड; नागरिकांमध्ये दहशत

अमरावती शहरात एकाच दिवशी दुहेरी हत्याकांड; नागरिकांमध्ये दहशत

अमरावती आयुक्तालय परिसरात आज एकाच दिवशी दोन हत्या झाल्याने शहर चांगलेच हादरले आहे.

अमरावती आयुक्तालय परिसरात आज एकाच दिवशी दोन हत्या झाल्याने शहर चांगलेच हादरले आहे.

अमरावती आयुक्तालय परिसरात आज एकाच दिवशी दोन हत्या झाल्याने शहर चांगलेच हादरले आहे.

अमरावती, 12 ऑगस्ट : अमरावती आयुक्तालय परिसरात आज एकाच दिवशी दोन हत्या झाल्याने शहर चांगलेच हादरले आहे. अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सिद्धार्थ क्रीडा मंडळ परिसरात एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारनाट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनिकेत ज्ञानदीप कोकणे (वय 18) असे मृत युवकाचे नाव असून तो आपल्या नातेवाईकांकडे आला होता. त्यावेळी तीन आरोपींनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याची हत्या केली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,२० सप्टेंबर २०२० रोजी लुंबिनी नगर परिसरात बंटी बारसे नामक तरुणाची हत्या करण्यात आली होती. या हत्येमध्ये मृतक अनिकेत कोकणे सहभागी असल्याच तपासात उघड झालं होतं. भावाच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने मृत बंटी याचा भाऊ प्रतीक बारसे व त्याचे दोन सहकारी कपिल भांडे, विशाल गडलिंग या तिघांनी मिळून अनिकेत कोकणे या तरुणाची हत्या केली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दुपारच्या सुमारास अनिकेत हा सिद्धार्थ नगर परिसरातील आपल्या नातेवाईकांकडे आला असल्याची माहिती आरोपीना मिळाली. त्यानुसार अनिकेतवर पळत ठेऊन असलेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी अनिकेत हा घराच्या मागील बाजूस असलेल्या एका बंद घराच्या व्हराड्यांत जाऊन लपला. मात्र आरोपींनी त्याला शोधून त्याच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनिकेतचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा-व्यायामाला जातो सांगून घराबाहेर पडले; शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचले व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. हत्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. राजापेठ पोलिसांच्या हद्दीतील आदर्श नगर परिसरात घडलेल्या मारहाणीच्या अन्य एका घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजय राठोड व पूजा राठोड या दाम्पत्यामध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने पती विजय राठोड याने पत्नी पूजाच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा लगावला व तिचा गळा दाबला. या मारहाणीत पूजाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घाबरलेल्या विजयने राजापेठ पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पूजाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून विजयवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Amravati, Crime news, Murder