Home /News /crime /

कॉलेजमधली मैत्रीण आवडायची; लग्नाला मात्र दिला नकार, तर तरुणाने घेतला गळफास

कॉलेजमधली मैत्रीण आवडायची; लग्नाला मात्र दिला नकार, तर तरुणाने घेतला गळफास

तरुणीसोबतचं प्रेमप्रकरण (love affair) लग्नाच्या (marriage) बोलणीपर्यंत जाऊन फिसकटल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या (depressed) तरुणानं गळफास घेऊन (hanged himself) आपलं आयुष्य (suicide) संपवलं.

    इंदूर, 12 ऑगस्ट : तरुणीसोबतचं प्रेमप्रकरण (love affair) लग्नाच्या (marriage) बोलणीपर्यंत जाऊन फिसकटल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या (depressed) तरुणानं गळफास घेऊन (hanged himself) आपलं आयुष्य (suicide) संपवलं. कॉलेजमध्ये असताना एका तरुणीची झालेली मैत्री, त्याचं प्रेमात झालेलं परिवर्तन आणि त्यानंतर लग्नाच्या पातळीवर बोलणी आली असताना अचानक तरुणीने संपर्क तोडल्यामुळे सैरभैर झालेल्या तरुणाने गळफास घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्याच्यासोबत राहणाऱ्या बहिणीसह कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. काय आहे प्रकरण? मध्यप्रदेशच्या धारमधील रहिवासी असणाऱ्या राजेश भामेचं पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी तो SI परीक्षेची तयारी करत होता. या तयारीसाठी इंदूरला जाण्याची त्याची इच्छा होती. त्यानुसार शेतकरी असणाऱ्या त्याच्या वडिलांनी त्याला शिक्षणासाठी इंदूरला पाठवलं. काही दिवसांत त्याची बहिणदेखील शिक्षणासाठी इंदूरला आली आणि ते दोघं एकाच घरात राहून शिक्षण पूर्ण करत होते, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे. याच काळात राजेशची ओळख कॉलेजमधील एका तरुणीशी झाली. काही दिवसांतच ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि प्रकरण लग्नाच्या बोलणीपर्यंत पोहोचलं. शिक्षण पूर्ण होताच आपल्याला नोकरी मिळेल आणि आपल्याला आवडणाऱ्या मुलीसोबत आपलं लग्नही होईल, या विचारांनी राजेश कमालीचा आनंदी होता. मात्र अचानक या तरुणीने राजेशसोबत संपर्क तोडला. ती त्याला भेटेनाशी झाली आणि त्याच्या फोनलाही प्रतिसाद मिळणं बंद झालं. या धक्क्याने तो वैफल्यग्रस्त झाला होता. आत्महत्येपूर्वी काही दिवस तो निराश असायचा, असं त्याच्या बहिणीनं पोलिसांना सांगितलं. हे वाचा -भाजप युवा मोर्चाच्या माजी शहराध्यक्षावर गोळीबार, घटनेचा धक्कादायक CCTV सुसाईट नोट आत्महत्येपूर्वी त्यानं लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या प्रेमप्रकरणाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. मात्र त्यातील तपशील पोलिसांनी अद्याप जाहीर केलेले नाहीत. राजेश आणि त्याची बहिण बुधवारी जेवण करून झोपले होते. बहिणीला सकाळी जाग आली, तेव्हा तिला राजेशचा छताला लटकणारा मृतदेह दिसला. हे पाहून तिला जबर धक्का बसला. तिनं तातडीनं पोलिसांना फोन करून याची कल्पना दिली. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Indore News, Love story, Suicide

    पुढील बातम्या