जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'महाविकासआघाडी'च्या बैठकीत काय झालं? सिल्व्हर ओकच्या चर्चेची Inside Story

'महाविकासआघाडी'च्या बैठकीत काय झालं? सिल्व्हर ओकच्या चर्चेची Inside Story

महाविकासआघाडीची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक

महाविकासआघाडीची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक

महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पार पडली. या बैठकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 मे : महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पार पडली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते, तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी हजेरी लावली. काँग्रेसकडून नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान, भाई जगताप आले होते. या बैठकीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत महाविकासआघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कर्नाटकमध्ये भाजपचा प्रचंड पराभव झाला, निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत साधक बाधक चर्चा झाली. महाविकासआघाडी एकसंध काम करणार आहे. उन्हाळ्यामुळे सभा स्थगित करण्यात आल्या आहेत. पुढे पावसाळा आहे, त्यामुळे इनडोअर सभा घेण्यात येणार आहेत. निवडणुकीबाबत हळूहळू चर्चा सुरू करणार आहे,’ असं जयंत पाटील म्हणाले. 5 लाखांच्या बक्षिसाला 10 लाखांचं प्रत्युत्तर, ठाकरे अन् शिंदेंच्या संजयमध्ये जुंपली! दिल्लीचं झूट आणि दिल्लीची लूट थांबली आहे, मोदी शाह- यांचा राग कर्नाटकने काढला आहे. महाराष्ट्राचं सरकार कर्नाटकपेक्षा भ्रष्ट आहे. महाराष्ट्र सरकार असंविधानिक आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. तसंच कर्नाटकच्या विजयाची चर्चा झाली असून, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार पुण्याच्या सभेत करणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. महाविकासआघाडीची सकारात्मक चर्चा झाली, सर्वानुमते चर्चा करण्यात आली. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही सर्व एकत्र आहोत. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही महाविकासआघाडीचा मोठा विजय होईल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. ‘घरात बसून स्वप्न बघितल्यावर…’, कर्नाटकच्या निकालावरून भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात