मुंबई, 14 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. आयएल ऍण्ड एफएलएस प्रकरणी ईडीने जयंत पाटील यांना चौकशीला बोलावलं आहे. जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवरून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे. भाजपच्या एका तरी नेत्यावर ईडी किंवा सीबीआयने कारवाई केली असेल तर दाखवा मी 5 लाख रुपये देतो, असं संजय राऊत म्हणाले आहेत. याला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी राम मंदिरासाठी संजय राऊतांना 10 लाख रुपये दिले होते, ते आधी परत करा आणि नंतर ईडीच्या कारवाईवर बक्षीस द्या, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीला मिळणार नवा भिडू? आणखी एक पक्ष सोबत यायला तयार ‘भाजपच्या अनेक भ्रष्ट देश लुटणाऱ्या राज्य लुटणाऱ्या अनेक नेत्यांच्या कारनाम्यांच्या फाईल मी ईडीकडे पाठवल्या आहेत. सीबीआयकडेही दिलेल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठवल्या आहेत. एक लाख काय मी पाच लाख देतो, कारवाई झालेली दाखवा,’ असं संजय राऊत म्हणाले. ‘संजय राऊत 5 लाख रुपये देत आहेत मला आश्चर्य वाटत आहे. राम मंदिराच्या निर्माणासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांना 10 लाख रुपये दिले होते, ती उधारी पहिले वापस करा, द्यायची कुठे भाषा करता? तुम्हाला घ्यायची भाषा कळते. तुम्हाला पत्राचाळमध्ये घोटाळा करता येतो. तुम्हाला इतरांना फसवून कुणाला तिकीटं द्यायची, यासाठी पैसे मागता येतात. देण्याची दानत असावी लागते, जी शिंदे साहेबांमध्ये आहे. पाच लाख रुपये दिले तर त्यांना झोप येणार नाही. जो खातो, ज्याला द्यायची सवयच नाही, तो काय देणार आहे?,’ असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी दिलं आहे. ‘काँग्रेस, राष्ट्रवादी तुमचं काय हाल करेल..’ शिंदे गटाचा ठाकरेंना थेट इशारा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.