जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ajit Pawar : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत भूकंप, अजितदादांच्या शपथविधीवर उद्धव ठाकरेंची एका ओळीची रिएक्शन

Ajit Pawar : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत भूकंप, अजितदादांच्या शपथविधीवर उद्धव ठाकरेंची एका ओळीची रिएक्शन

अजितदादांच्या शपथविधीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

अजितदादांच्या शपथविधीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका वर्षात दुसरा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका वर्षात दुसरा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथ घेतलेल्यांमध्ये अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. तसंच आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सत्तेत सहभागी झालो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय आपण आगामी निवडणुका भाजप-शिवसेनेसोबत घड्याळ या चिन्हावरच लढवणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. अजितदादांचं बंड यशस्वी कसं झालं? पडद्यामागच्या घडामोडींची Inside Story उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या या फुटीवर उद्धव ठाकरेंनी एका ओळीची प्रतिक्रिया दिली आहे. नांदा सौख्य भरे, असं उद्धव ठाकरे अजित पवारांच्या शपथविधीवर म्हणाले आहेत. शरद पवारांची रिएक्शन दरम्यान या सगळ्या प्रकारावर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या भूमिकेला आपला पाठिंबा नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच या नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत. अध्यक्ष म्हणून मी सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांना महासचिव आणि कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती, पण त्यांनी ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. पक्षातील प्रमुख नेते मिळून याबाबत निर्णय घेतील, असं पवारांनी सांगितलं. दुसरीकडे शरद पवार यांनी आपण न्यायालयात जाणार नाही तर जनतेसमोर जाऊन पुढची लढाई लढू असंही थेट सांगितलं आहे. आपण उद्याच कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेऊन जनतेमध्ये जाणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं श्रेय कुणाला? शरद पवारांनी घेतलं एकच नाव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात