जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार? भाजप आमदाराकडून मोठा गौप्यस्फोट

विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार? भाजप आमदाराकडून मोठा गौप्यस्फोट

अजित पवारांच्या मनात नेमकं काय?

अजित पवारांच्या मनात नेमकं काय?

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अजित मांढरे, प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार की काय अशी कुणकुण लागली आहे. यांचं कारण म्हणजे अजितदाद भाजपा सोबत येणार अशी पक्षामध्ये चर्चा सुरु आहे असं वक्तव्य भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलं. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना दुजोरा मिळतोय असच म्हणावं लागेल. आधीचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि आताचे भाजपा कल्याण पूर्वेचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पक्षामध्ये चर्चा सुरू आहे की एक मोठा गौप्य स्फोट होणार आहे. खरंतर अजित दादा हे कणखर नेतृत्व आहे आणि अजित दादा भारतीय जनता पक्षासोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जर आले तर महाराष्ट्राच्या विकासाला अजुन गती मिळेल.

‘भूकंप सांगून येत नाही तर..’ अजित पवारांच्या भाजपप्रवेशाबाबत अशोक चव्हाणांचा मोठा दावा

आपण जर बघितलं असेल एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो काम करण्याचा स्पीड आहे. त्या स्पीड मध्ये अजून जर एक तिसरा इंजिन लागला तर आमच्या गाडीचा अजून स्पीड वाढेल असं मत व्यक्त करुन दादांचं आम्ही स्वागतच करणार आहोत आम्हाला आनंद आहे असं वक्तव्य आमदार गणपत गायकवाड यांनी केलं.

राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी, अजितदादांनी मौन सोडलं!

त्यामुळे अजित पवार यांच्या बाबत सुरु असलेल्या चर्चांना गणपत गायकवाड यांच्या वक्तव्याने दुजोरा दिलाय असच म्हणावं लागेल. तर अजित दादा सोबत आल्याने युती आणखी भक्कम होईल असं शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी वक्तव्य केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात