मुंबई, 11 मे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अखेर लागला आहे. सुप्रीम कोर्टाने राज्यपालांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत कडक शब्दांमध्ये ताशेरे मारले असले तरी 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे सोपावण्यात आला आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी बोलावणं चूक होतं, पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यपालांचं एकनाथ शिंदे यांना शपथविधीसाठी बोलावणं योग्य असल्याचं निरिक्षण कोर्टाने मांडलं. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा या संपूर्ण प्रकरणात कळीचा मुद्दा ठरला. सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, मी पुस्तकामध्ये लिहिलं आहे, असं शरद पवार म्हणाले. राज्यपालांची निवड किती चुकीची केली जाते, याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं आहे. निकालाची कॉपी वाचूनच प्रतिक्रिया देणं योग्य होईल. कोर्टाने जे राज्यकर्ते आहेत त्यांच्याविषयीची तीव्र भूमिका मांडली. लेजिस्लेटिव्ह पार्टी फायनल नाही, राजकीय पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे, असं कोर्टाने सांगितलेलं दिसतंय, अशी प्रतिक्रिया दिली. आमदारांच्या अपात्रतेबाबत नवा ट्विस्ट, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांची गुगली काही निर्णय अद्याप व्हायचे आहेत. अध्यक्षांकडे महत्त्वाचा मुद्दा सुपूर्द केला आहे. डिसक्वालिफिकेशनचा निर्णय विशिष्ट काळात घ्यावा, अशी अपेक्षा केली आहे. इन्सटिट्यूशनबद्दल यांना किती आस्था आहे हे कळेल, त्याआधी बोलणं योग्य नाही, असंही शरद पवार म्हणाले. ‘उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत पुस्तकामध्ये विषय आहे, त्यात मी स्वच्छ म्हणलं आहे. मी स्वच्छ म्हणल्यामुळे आमचे काही मित्र नाराजही झाले, त्यामध्ये नाराज करण्याचा हेतू नव्हता. ती वस्तूस्थिती होती. आज सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे. जे झालं ते झालं, आम्ही उद्धव ठाकरे आणि काँग्रेस जोमानं काम करू’, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. …म्हणून मी राजीनामा दिला, कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काँग्रेस तसंच उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. यावर राष्ट्रवादीचीही हीच भूमिका आहे का? असं विचारण्यात आलं, तेव्हा नैतिकता आणि भाजप यांच्यामध्ये कॉन्ट्रॅडिक्शन असल्याची टीका शरद पवारांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.