जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / आमदारांच्या अपात्रतेबाबत नवा ट्विस्ट, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांची गुगली

आमदारांच्या अपात्रतेबाबत नवा ट्विस्ट, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांची गुगली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटलं की, शिवसेना पक्षातून फुटलेल्या आणि अपात्रतेच्या खटल्याला सामोरे जात असलेल्या आमदारांचा गट राजकीय पक्षावर दावा ठोकू शकत नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 मे : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला दिलासा दिला. दरम्यान, फुटलेल्या आमदारांचा गट पक्षावर दावा करू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालायने म्हटलं. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर पत्रकार परिषदेत दोन गटांपैकी राजकीय पक्ष कोणता हे विधानसभा अध्यक्ष ठरवतील, त्यानंतर अपात्रतेचा निर्णय होईल असं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटलं की, शिवसेना पक्षातून फुटलेल्या आणि अपात्रतेच्या खटल्याला सामोरे जात असलेल्या आमदारांचा गट राजकीय पक्षावर दावा ठोकू शकत नाही. कुठलाही गट पक्षावर दावा करू शकत नाही. कारवाईपासून पळण्यासाठी हा दावा तकलादू. शिंदे गटाने कुठल्याही पत्रात पाठिंबा काढला असे सांगितले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, निवडणूक आयोगाने शिंदेंना शिवसेना सोपवलीय. त्यात कोणतीच अडचण नाही. त्याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला आहे. तर विधानसभा अध्यक्षांना हा अधिकार दिला आहे की, राजकीय पक्ष कोणता याचा निर्णय प्रथमदर्शनी विधानसभा अध्यक्ष करू शकतील. विधानसभा अध्यक्षांना आता अधिकार आहे की दोन गटांपैकी राजकीय पक्ष कोणता हे ठरवतील. त्यानंतर अपात्रतेचा निर्णय होईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया न्यायालयाचा हस्तक्षेपाला नकार महाविकासआघाडीच्या मनसुब्यावर पाणी फेरत उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही हे कोर्टाने सांगितलं. डिसक्वालिफिकेशनच्या पिटिशनचा अधिकार हा स्पीकरचा आहे, त्यामुळे स्पीकर यावर सुनावणी घेतील हे स्पष्ट झालं आहे. कोणतीही एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन नाही त्यामुळे कोर्टाने हस्तक्षेप करायला नकार दिलाय. ज्यांच्यावर डिसक्वालिफिकेशन पेंडिग आहे त्यांना पूर्ण अधिकार आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. राज्यपालांच्या कृतीचं समर्थन राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावणं समर्थनीय असल्याचं न्यायालयाने म्हणलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शंकेचं निरासन केलं असावं, अर्थात ते सर्वोच्च न्यायालयाला मानत असेल तर असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात