महाराष्ट्रातला राजकीय पेच : राज्यपालांनी केली विधानपरिषद निवडणुकांसाठी विनंती

महाराष्ट्रातला राजकीय पेच : राज्यपालांनी केली विधानपरिषद निवडणुकांसाठी विनंती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पद टिकवण्यासाठी सभागृह सदस्यत्व मिळणं आवश्यक असताना राज्यपालांनी ही विनंती केल्याने राजकीय घडामोडींना उधाण येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : विधानपरिषदेच्या 9 जागा रिक्त आहेत. त्यासाठी लवकरात लवकर निवडणूक जाहीर करावी, अशी विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पद टिकवण्यासाठी सभागृह सदस्यत्व मिळणं आवश्यक असताना ही विनंती राज्यपालांनी केल्याने राजकीय घडामोडींना उधाण येण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेतल्या या 9 जागा 24 एप्रिलपासून रिक्त आहेत. Coronavirus च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाल्याने निवडणुका होऊ शकल्या नाहीत. अधिवेशनही झालेलं नाही. लॉकडाऊनचा कालावधी 3 मे रोजी संपला की थोडी नियमांमध्ये थोडी शिथिलता येईल. त्यामुळे निवडणुकांची घोषणा करणं शक्य होईल, असंही कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे, अशी माहिती राजभवनातून देण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गृहमंत्रालयाने घेतला आता महत्त्वपूर्ण निर्णय

ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त रिक्त जागेवर आमदारकी मिळावी यासाठी सत्ताधारी पक्षांचे प्रयत्न सुरू असतानाच राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे निवडणूक घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे भविष्यात नवीन राजकीय घडामोडींचे हे संकेत असल्याचं बोललं जात आहे.

घरी जाण्यासाठी परप्रांतीयांना पाळावे लागतील 'हे' नियम, सरकारने केले जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्हीपैकी कुठल्याच सभागृहाचे अद्याप सभासद नाहीत. त्यांना पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यात आमदारकी मिळवणं आवश्यक आहे. येत्या 27 मेपर्यंत ठाकरे आमदार म्हणून निवडून येणं आवश्यक आहे. नाहीतर राजकीय पेच निर्माण होऊ शकतो.

लाॅकडाऊन कालावधी 3 मे नंतर संपणार आहे त्यानंतर अनेक भागात शिथिलता दिली जाईल अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोग आता काय निर्णय घेतो यावर महाराष्ट्राचं आणि ठाकरे यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

महाराष्ट्र दिनाची अमूल्य भेट: 1800 मराठी विद्यार्थ्यांची राजस्थानातून झाली सुटका

First published: April 30, 2020, 8:39 PM IST

ताज्या बातम्या