महाराष्ट्र दिनाची अमूल्य भेट : 1800 मराठी विद्यार्थ्यांची राजस्थानातून अशी झाली सुटका
राजस्थानच्या कोटा इथे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी गेलेले महाराष्ट्रातले 1800 विद्यार्थी लॉकडाऊनमुळे तिथेच अडकले होते. एसटीच्या 73 बसमधून ते कसे आले पाहा PHOTO
|
1/ 7
केंद्र सरकारने अडकलेल्या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यात जाण्याची मुभा देण्याची सूचना केली आणि महाराष्ट्रातले थोडे थोडके नव्हे तर 1800 विद्यार्थी कोटा इथे अडकले होते, त्यांचा जीव भांड्यात पडला.
2/ 7
केंद्राने घालून दिलेल्या सगळ्या नियमांची पूर्तता करू या विद्यार्थ्यांनी गुरुवारी महाराष्ट्राकडे कूच केलं. बरोबर महाराष्ट्र दिनाला ते राज्यात पोहोचतील.
3/ 7
महाराष्ट्र शासनाने खास प्रयत्न करून या विद्यार्थ्यांना मायभूमीकडे आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली.
4/ 7
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आम्हाला आमच्या गावी जायला मिळणं यासारखी मोठी भेट नाही, अशीच भावना या वेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आणि राज्य शासनाचे आभार मानले.
5/ 7
या मुलांना घेऊन येण्यासाठी राज्यातर्फे 73 एसटी बसेस राजस्थानात धाडण्यात आल्या होत्या.
6/ 7
व्यवस्थित नोंदणी करून, त्यांची तपासणी करून या 1800 विद्यार्थ्यांना राजस्थानातून सोडण्यात आलं, तेव्हा त्यांनी बसमध्येच जय महाराष्ट्रचा जयघोष केला.
7/ 7
आम्हाला आमच्या राज्यात जाऊ द्या, अशी या विद्यार्थ्यांनी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. स्पर्धा परीक्षा अभ्यासाचं केंद्र झालेल्या कोटा इथे हे विद्यार्थी होते.