कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गृहमंत्रालयाने घेतला आता महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गृहमंत्रालयाने घेतला आता महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्यविभाग रात्रंदिवस परिश्रम घेत आहे.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल: राज्यात कोरोना विषाणूनं अक्षरश: थैमान घातलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्यविभाग रात्रंदिवस परिश्रम घेत आहे. त्यात गृहमंत्रालयानेही आपल्या पातळीवर तयारी केली आहे. कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातील सात कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे. त्यात आता आठव्या नागपूर मध्यवर्ती या कारागृहाची भर पडली आहे. हे कारागृहही तातडीने लॉकडाऊन करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

हेही वाचा.. Corona चे स्रोत मानली जाणारी वटवाघळंच आता व्हायरसपासून वाचवणार?

यापूर्वीच्या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, व कल्याण जिल्हा कारागृह, औरंगाबाद व नाशिक ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात आली आहेत.

यापूर्वी लॉकडाऊन झालेल्या कारागृहातील कार्यपद्धतीनुसार नागपूर कारागृह अधिक्षकांनी कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन शिफ्टमध्ये करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था आतच करण्यात करण्यात यावी. मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी.

हेही वाचा.. महाविद्यालयाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय, लवकरच जाहीर होणार वेळापत्रक

कारागृहात काम करणार्‍या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर देण्यात येतील. जर कुटुंबाला काही अडचण भासली त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधावा. ज्यायोगे त्यांच्या अडीअडचणीचे निराकरण होईल.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 30, 2020, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading