मुंबई, 12 मार्च : मुंबईत बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या कारखान्यावर छापा घालण्यात आला. 1 लाख 10 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. वाकोला इथे FDA ने ही कारवाई केली. कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे सांताक्रूझ परिसरातल्या वाकोला इथे एका छोट्या कारखान्यात कुठलंही लायसन्स न घेता अचानकपणे सॅनिटायझर तयार करण्याचा उद्योग सुरू केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.