पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीने कशी फिरवली बाजी? 'त्या' पावसातल्या सभेचं होतं निमित्त

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीने कशी फिरवली बाजी? 'त्या' पावसातल्या सभेचं होतं निमित्त

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एकतर्फी होणार, निवडणुकीपूर्वी भाजप- सेना युती जाहीर झाल्याने त्यांचा विजय सोपा होणार असं बोललं जात असतानाच अचानक हवा पालटली कशी?

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एकतर्फी होणार, निवडणुकीपूर्वी भाजप- सेना युती जाहीर झाल्याने त्यांचा विजय सोपा होणार असं बोललं जात असतानाच अचानक शेवटच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची हवा निर्माण झाली होती. विशेषतः निमशहरी भागांमध्ये त्याचं प्रतिबिंब पडलेलं निवडणूक निकालाचे पहिले कल हाती आल्यानंतर कळलं.

राष्ट्रवादीचे मोठं यश

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना धक्का बसण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण त्यांच्याविरोध शरद पवार यांचा प्रचार प्रभावी ठरल्याचं निकालावरून दिसतं.

Maharashtra Election Result : मुंबई, ठाण्यात भाजप नाही, तर शिवसेनाच 'मोठा भाऊ'

उदयनराजेंना मोठा धक्का मतदारांनी दिला आहे. श्रीनिवास पाटील निर्णायक आघाडीच्या जवळ आहेत.

धनंजय मुंडेंना निर्णायक आघाडी

परळीच्या मुंडे भाऊ-बहिणीतली लढत लक्षवेधी ठरली. विद्यमान मंत्री आणि भाजपच्या मोठ्या नेत्या पंकजा मुंडे पराभवाच्या छायेत आहेत. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना दुसऱ्या फेरीपासून आघाडी मिळाल्याचं चित्र आहे.

मावळमध्ये बाळा भेगडे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो. राष्ट्रवादीने या आपल्या बालेकिल्ल्यात पुन्हा जम बसवल्याचं हे लक्षण मानलं जात आहे.

विदर्भात खिंडार

दुसरीकडे विदर्भात भाजप-सेना युतीला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळणार असं दिसत आहे. विरोध पक्ष प्रबळ होण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्तारुढ युतीचा प्रभाव कमी झाल्याचं हे चित्र मानलं जात आहे.

Maharashtra Election Result 2019 : विदर्भ भाजपला तारणार की फटका बसणार?

भगव्या युतीच्या गेल्या निवडणुकीत 40 हून अधिक जागा होत्या. या वेळी जेमतेम 30 जागा युतीकडे येण्याची शक्यता आहे. हे 10 जागांचं नुकसान मोठं ठरू शकतं.

---------------------------------

पाऊस नाही शरद पवार बरसले, भरपावसातलं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 12:09 PM IST

ताज्या बातम्या