Mumbai-Thane Election Result 2019 LIVE : मुंबई, ठाण्यात भाजप नाही, तर शिवसेनाच 'मोठा भाऊ'

Mumbai-Thane Election Result 2019 LIVE : मुंबई, ठाण्यात भाजप नाही, तर शिवसेनाच 'मोठा भाऊ'

Mumbai-Thane Election Result 2019 LIVE : युतीमध्ये भाजपपेक्षा कमी जागा लढवणाऱ्या शिवसेनेला मुंबई-ठाणेकरांनी चांगली साथ दिल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेनं कोणाला कौल दिला आहे. हे काही वेळात स्पष्ट होईलच. पण युतीमध्ये भाजपपेक्षा कमी जागा लढवणाऱ्या शिवसेनेला मुंबई-ठाणेकरांनी चांगली साथ दिल्याचं पाहायला मिळत आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेनं मुंबईसह ठाण्यात आघाडी घेतली. मुंबईमध्ये सध्या भाजप 14 तर शिवसेना 15 जागांवर आघाडीवर आहे. तर ठाणे-कोकणमध्ये भाजप 10 आणि शिवसेनेनं 16 जागांवर आघाडी घेतली आहे.

विधानसभा निवडणूक 2019 आघाडी

भाजप शिवसेना काँग्रेस  राष्ट्रवादी वंचित मनसे इतर

मुंबई                14         15           4         1           0       0   2

ठाणेकोकण   10        16            2         5          0       0    6

मुंबई, ठाण्यातील 2014मध्ये काय होती परिस्थिती?

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014मध्ये भाजपनं मुंबईत 15 जागा आणि शिवसेनेनं 14 जागांवर विजय मिळवला होता. तर ठाण्यात भाजपनं 7 आणि शिवसेनेनं 15 जागा जिंकल्या होत्या.

(वाचा : Election Result 2019 Live: मतमोजणीदरम्यान नाशिकमध्ये गोंधळ, मशीन बदलल्याचा काँग्रेसचा आरोप

Exit Poll : भाजप की शिवसेना, मुंबईत मोठा भाऊ कोण? मतदारांनी दिलं उत्तर

News18 Lokmat  आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज EXIT POLL मध्ये होता. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. मुंबईत 33 जागांसाठी लढण्यात आलेल्या निवडणूकीत भाजप 17 आणि सेनेला 16 जागा मिळणार असा अंदाज EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला असून काँग्रेसला फक्त दोन जागा राखण्यात यश मिळेल तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असं चित्र होतं. तर अपक्षाला एक जागा राखण्यात यश मिळाल्याचं EXIT POLL मध्ये सांगण्यात आलं.ठाण्यात 17 जागांसाठी लढण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये भाजपला 9 आणि शिवसेनेला 8 जागा राखता आल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून ठाण्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नसून राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा राखण्यात यश मिळालं असून अपक्षाला एक जागा जिंकता आली.

(वाचा : पहिल्या फेरीत अभिजीत बिचुकलेला भोपळा, आदित्य 7 हजार मतांनी आघाडीवर)

लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजप जोरदार मुसंडी मारणार असंच चित्र यामध्ये दिसत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला शंभरी गाठता आली नव्हती. तर आता एक्झिट पोलमध्ये आघाडीला 41 जागा मिळतील असं समोर आलं आहे. तर भाजप शिवसेना युतीला तब्बल 243 जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना-भाजपला 2014 च्या तुलनेत 11 जागा जास्त मिळण्याची शक्यता आहे. यावेळी युतीला 43 तर आघाडीला 23 जागा मिळतील असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.2014 मध्ये मुंबई- ठाण्यात एकूण 54 जागांसाठी मतदान करण्यात आलं होतं. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ 2014 च्या निवडणुकीत भाजपकडे गेला. 2014 च्या निवडणुकीत युती आणि आघाडी तुटल्याने सगळी समीकरणं बदलली.

LIVE VIDEO : उदयनराजे अडचणीत, तर मनसेसाठी खूशखबर!

Published by: Akshay Shitole
First published: October 24, 2019, 11:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading