अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या भारतातील लोकशाहीचा आज सर्वात मोठा उत्सव आहे. 17व्या लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपने 42 जागांवर आघाडी घेतली आहे. तर राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्याच पाश्वभूमिवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपने देशभर जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहे. नितीन गडकरी यांनीदेखील पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले.