संचारबंदीमुळे वेळेत गावी पोहोचला नाही मुलगा, उपचाराअभावी विझली वडिलांची प्राणज्योत

संचारबंदीमुळे वेळेत गावी पोहोचला नाही मुलगा, उपचाराअभावी विझली वडिलांची प्राणज्योत

संचारबंदीमुळे मुलगा वेळेत गावी न पोहोचल्यामुळे वडिलांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

स्वप्निल घाग, (प्रतिनिधी)

चिपळून, 27 मार्च: संचारबंदीमुळे मुलगा वेळेत गावी न पोहोचल्यामुळे वडिलांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुहागर तालुक्यातील परचुरी गावातले रहिवासी असलेले 75 वर्षीय रावजी सोलकर यांना काल (गुरुवारी) अर्धांगवायूचा झटका आला होता. शेजारच्या नागरिकांनी त्यांना तात्काळ चिपळूणमधील लाईफ केअर या खासगी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा..वाटेतच झाला वडिलांचा मृत्यू, मृतदेह बाईकवरून नेण्याची मुलांवर वेळ

वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती गावकऱ्यांनी त्यांचा मुंबईत असलेला मुलगा विश्वास याला दिली. यानंतर विश्वास गावी यायला निघाला खरा, मात्र संचारबंदीमुळे विश्वासला घराबाहेर पडणं मुश्कील झालं. त्याने वडिलांना अॅडमिट केल्याचे सर्व पेपर व्हॉटसॲपवर मागावल्यानंतर त्याला मुंबईतून सोडण्यात आले. मात्र रायगडमधील वडखळ येथे विश्वासला पोलिसांनी अडवलं आणि पेपर्स दाखवून देखील पुढे यायची परवानगी नाकारली. यामुळे तो पुन्हा बोरीवलीला परतला.

मुलगा पोहोचू शकत नाही. त्यामुळे कोमात गेलेल्या वडिलांच्या बाबतीत निर्णय घेणारे जबाबदार कोणीही नसल्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाने अखेर रावजी सोलकर यांना घरी पाठवले. उपचाराअभावी अखेर शुक्रवारी पहाटे रावजी सोलकर यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा.. परप्रांतीय 40 मजुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला, 3 दिवसांपासून सर्व उपाशी

वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मुलाला देण्यात आली. मृत्युचे ग्रामपंचायतीचे पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर विश्वासला मुंबईतून अनेक तपासणी केल्यानंतर सोडण्यात आले. विशेष म्हणजे ज्या वडखळ नाक्यावर त्याला वडिलांच्या आजारपणासाठी सोडण्यात आले नाही. त्याच नाक्यावर त्याच्या मोबाइलमधले ग्रामपंचायतचे वडिलांच्या मृत्यूचा उल्लेख असलेले पत्र वाचल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी सोडण्यात आले.

हेही वाचा...मुंबईत Coronavirus मुळे एका डॉक्टरचा मृत्यू; घरातले 6 जणही निघाले पॉझिटिव्ह

देशात लॉकडाऊन असताना अनेक लोकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. विश्वासने आवश्यक असलेले सर्व पेपर्स दाखवून देखील त्याला पुढे न सोडल्यामुळे त्याने आपले वडील गमावले आहेत. त्यामुळे अशीप्रकारे कोणी अडचणीत असेल तर त्याने यंत्रणेसमोर काय करावे, असा नवा प्रश्न आता उभा राहिला आहे.

First published: March 27, 2020, 6:15 PM IST

ताज्या बातम्या