मृत्युनंतरही यातना.. वाटेतच झाला वडिलांचा मृत्यू, मृतदेह बाईकवरून नेण्याची मुलांवर वेळ

मृत्युनंतरही यातना.. वाटेतच झाला वडिलांचा मृत्यू, मृतदेह बाईकवरून नेण्याची मुलांवर वेळ

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन दरम्यान रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. याचा फटका पालघर जिल्ह्यातील चिंचारे येथील एका कुटुंबाला बसला आहे.

  • Share this:

पालघर, 27 मार्च: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन दरम्यान रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. याचा फटका पालघर जिल्ह्यातील चिंचारे येथील एका कुटुंबाला बसला आहे. वाहन न मिळाल्याने वडिलांचा मृतदेह चक्क मोटारसायकलवरून घरी नेण्याची वेळ मुलांवर आली आहे.

हेही वाचा..Inside Story : सांगलीमध्ये 'कोरोना'चा गुणाकार, आधी 4 आता 12 जण पॉझिटिव्ह

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मूळचे चिंचारे येथील असलेल्या लडका वावरे यांना काही दिवसांपूर्वी सर्पदंश झाला होता. मात्र, उपचारासाठी त्यांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचार पूर्ण झाल्याचं सांगत कासा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना डिस्चार्ज दिला. मात्र, घरी जात असताना अचानक लडका वावरे मोटरसायकल वरच मृत्यू झाला. त्यामुळे घरी जाण्यासाठी वाहन उपलब्ध न झाल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मोटरसायकल वरूनच घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. अर्ध्या रस्त्यात त्यांचा मोटरसायकलवरच लडका वावरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने त्यांच्यावर योग्य उपचार केले नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांकडून केला आहे.

हेही वाचा...मुंबईत Coronavirus मुळे एका डॉक्टरचा मृत्यू; घरातले 6 जणही निघाले पॉझिटिव्ह

दुसरी घटना गुहागर तालुक्यातील परचुरी येथे घडली आहे. संचारबंदीमुळे मुलगा वेळेत गावी न पोहोचल्यामुळे वडिलांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

गुहागर तालुक्यातील परचुरी गावातले रहिवासी असलेले 75 वर्षीय रावजी सोलकर यांना गुरुवारी अर्धांगवायूचा झटका आला होता. स्थानिकांनी त्यांना तात्काळ चिपळूणमधील लाईफ केअर या खासगी रुग्णालयात दाखल केले. वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती गावकऱ्यांनी त्यांचा मुंबईत असलेला मुलगा विश्वास याला दिली. यानंतर विश्वास गावी यायला निघाला खरा मात्र संचारबंदीमुळे विश्वासला घराबाहेर पडणं मुश्कील झालं. त्याने वडिलांना अॅडमिट केल्याचे सर्व पेपर व्हॉटसॲपवर मागावल्यानंतर त्याला मुंबईतून सोडण्यात आले मात्र रायगडमधील वडखळ येथे विश्वासला पोलिसांनी अडवलं आणि पेपर्स दाखवून देखील पुढे यायची परवानगी नाकारली. यामुळे तो पुन्हा बोरीवलीला परतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2020 05:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading