मुंबईत Coronavirus मुळे एका डॉक्टरचा मृत्यू; घरातले 6 जणही निघाले पॉझिटिव्ह
मुंबईत Coronavirus मुळे एका डॉक्टरचा मृत्यू; घरातले 6 जणही निघाले पॉझिटिव्ह
या डॉक्टरांचा नातू 12 मार्चला ब्रिटनहून परत आला होता. तो सेल्फ क्वारंटाइन होता. पण तरीही त्याच्या घरातल्या सर्वच्या सर्व 6 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबई, 27 मार्च : देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत आणखी एका रुग्णाचा Coronavirus ने बळी घेतल्याचं समोर आलं आहे. इथल्या हिंदुजा रुग्णालयात काल रात्रीच एका 82 वर्षांच्या डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची Covid-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार या डॉक्टरांचा नातू 12 मार्चला ब्रिटनहून परत आला होता. तो सेल्फ क्वारंटाइन होता. पण तरीही त्याच्या घरातल्या सर्वच्या सर्व 6 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोरोनाव्हायरसचं थैमान जगभरात आता पुढच्या टप्प्यात पोहोचल्याचं स्पष्ट आहे. 5 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे आणि मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे 24,057 एवढे मृत्यू जगभरात झाले आहेत.
6 दिवसांत 100 लोकांना भेटला, 23 जण पॉझिटिव्ह, लाखोंना संसर्गाचा धोका
भारतातही मृत्यूचा आकडा वाढतो आहे. आतापर्यंत आपल्या देशात 17 जणांचा प्राण या विषाणूने घेतला आहे.
भारतात आतापर्यंत 724 रुग्ण सापडले असून त्यातले 66 बरे झाले आहेत, तर 17 मृत्युमुखी पडले आहेत.
बापरे... स्पेन आणि इटलीत ‘मॉल’चं झालं शवगृह, दफविधीसाठीही वेटिंगलिस्ट
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात आज एकूण 17 नवीन रुग्ण आढळले आहे. सांगलीमध्ये आज नवे 12 रुग्ण आढळले आहे. तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल 147 वर पोहोचली आहे.
अन्य बातम्याकोरोनाच्या लढाईत IAS अधिकाऱ्याकडून गंभीर चूक, क्वारंटाइन असतानाही केला प्रवासकोरोनामुळे अमेरिकेत होवू शकतो 80 हजार लोकांचा मृत्यू, IHMEने व्यक्त केली भीती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.