परप्रांतीय 40 मजुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला, 3 दिवसांपासून सर्व उपाशी

परप्रांतीय 40 मजुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला, 3 दिवसांपासून सर्व उपाशी

कोरोना व्हायरसच्या भीतीने ३ दिवसांपूर्वीच मुंबईहून एका ट्रकमध्ये लपून निघालेल्या विविध राज्यातील 40 मजुरांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:

ठाणे, 27 मार्च: कोरोना व्हायरसच्या भीतीने ३ दिवसांपूर्वीच मुंबईहून एका ट्रकमध्ये लपून निघालेल्या विविध राज्यातील 40 मजुरांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक म्हणजे हे सर्व मजूर एका ट्रकमध्ये कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले. मुंबई आणि ठाणेची हद्द बेकायदेशीरपणे ओलांडून हे मजूर नाशिकला पोहोचले मात्र त्यांना तिथून पुढे जाता आले नाही.

हेही वाचा..कोरोनामुळे पंढरपुरात 400 वर्षांची परंपरा खंडीत, चैत्र वारीचा सोहळा रद्द

शुक्रवारी सकाळी पुन्हा मुंबईच्या दिशेने जात असताना ठाण्यातील आनंद नगर चेक पोस्टवर ठाणे पोलिसांनी ट्रक पकडला. ट्रकची झडती घेतली असता ट्रॅकमध्ये 40 मजूर लपवलेले आढळून आले. पोलिसांना पाहताच या सर्वांना रडू कोसळले. 3 दिवस उपाशी पोटी गुराढोरांसारखे कोंबून फिरत असल्याचं त्यांनी सांगितलं. अन्न-पाणी नाही त्याच पकडलो गेलो तर पोलिस मारतील या भीतीने हे मजूर पोलिसांना पाहताच रडू लागले. पण ठाणे पोलिसांनी माणुसकी दाखवत सर्वांना कोपरी पोलिस स्टेशनमध्ये नेऊन त्या ठिकाणी ललिता पवार या महिलामार्फत त्यांना जेवणाची सोय केली, पुढे मुंबईहून ज्या ठिकाणाहून ते आलेत तेथे पाठवण्याची सोय ठाणे पोलिसांनी करुन दिली, अशी माहिती कोपरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली.

हेही वाचा.. कोरोनाच्या भीतीने कर्मचारी गायब, पुणे-मुंबईचा दूध पुरवठा ठप्प होण्याची शक्यता

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक

दुसरीकडे, नवी मुंबईत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. संचारबंदी असताना

केळीची पाने टेम्पोला बांधून केळीच्या पानांची निर्यात करत असल्याचा बनाव करण्यात आला. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात 5 प्रवासी आढळून आले.

मुंबईहून ते आपल्या मूळ गावी जात होते. कळंबोली वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

First published: March 27, 2020, 5:04 PM IST

ताज्या बातम्या