ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
कोल्हापूर, 28 मे : शिवसंपर्क अभियानासाठी शिवसेने नेते संजय राऊत (Sanjay Raut) कोल्हापुरात दाखल झाले आहेत. संजय राऊत दोन दिवस कोल्हापुरात (Kolhapur) आहे. या काळात सभा, बैठका होणार असून त्यानंतर कोल्हापुरातील माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना संजय राऊत देणार आहेत. याच दरम्यान संजय राऊत यांना राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेच्या संदर्भात संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी केलेल्या आरोपावर विचारले असता त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना पुरस्कृत संदर्भात संभाजीराजेंना ठोस आश्वसन दिलं नव्हतं
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण केला जात आहे ते चुकीचं आहे. सहावी जागा शिवसेनेची आहे. त्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा हे आधीच ठरलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना असं सांगितलं होतं की, पुरस्कृत हा विषय आहे त्या संदर्भात मला माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलावं लागेल. मला असं वाटतं हा विषय संपलेला आहे. काल संभाजीराजेंनी आपलं मन मोकळं केलं आहे. आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेतो, उद्धव ठाकरे घेतात. त्यांनी निर्णय घेतला की, राज्यसभेवर दोन शिवसैनिक पाठवायचे आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला.
वाचा : "मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला..."; संभाजीराजेंचा आरोप
जर 42 मतांचा विषय होता. तुम्हाला जर राजकारणात करिअर करायचं असेल तर तुम्हाला (राजे, महाराजे, संस्थानिक आहेत त्यांना) कुठल्या तरी पक्षात जावं लागतं. अगदी महाराणा प्रताप यांचे वंशजही एका पक्षात आहेत. राजकीय विचार घेऊनच पुढे जायचं असतं. व्यक्तिगत काही नसतं. आम्ही संभाजीराजेंना विनंती केली पण त्यांनी स्वीकारली नाही. ठिक आहे... आमच्यासाठी विषय संपला असंही संजय राऊत म्हणाले.
वाचा : राज्यसभा उमेदवारीच्या संदर्भात संभाजीराजेंनी केली मोठी घोषणा
चंद्रकांतदादा पाटील कोण? ते वशंज आहेत का शिवाजी महाराजांचे? ते कोण ठरवणारे? त्यांनी आधी 2019 ला मोडलेल्या शब्दाचा आधी खुलासा करावा. शब्द मोडण्याची परंपरा कुणाची आहे. फसवणारे कोण आहेत? 2019 ला शब्द कुणी दिला होता आणि कुणी मोडला? यावर आम्ही शक्यतो बोलणं आता टाळतो. आताचा विषय हा संभाजीराजे आणि आमच्यातील आहे. इतरांनी चोमडेपणा करू नये. या प्रकरणात भाजपचा संबंध काय आहे? आमच्या पक्षाच्या निर्णयासंबंधात आम्ही त्यांना उत्तर का द्यावं? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विषय आमच्यासाठी संपला आहे. कोल्हापुरातील संजय पवार यांना आम्ही दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे कुणाच्या मालकीचे नाहीयेत. शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत हे लक्षात घ्या असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Rajyasabha, Sambhajiraje chhatrapati, Shiv sena, Uddhav thackeray