कोल्हापूर, 28 जानेवारी : काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या युतीवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आमने-सामने आल्याचंही पहायला मिळालं. आता वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत महाविकास आघाडीची काय भूमिका आहे, यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीने सर्व निवडणुका या एकत्र लढाव्यात अशी आमची भूमिका आहे. जागा वाटपाबाबत अजून काहीही ठरलं नाही. मात्र युतीबाबत वंचित बहुजन आघाडी आणि आमची अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं शरद पवार यांनी?
जागा वाटपाबाबत आमचं अजूनही काही ठरलं नाही, मात्र निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढवाव्यात अशी आमची भूमिका असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकरांबाबत बोलताना पवार म्हणाले की, आघाडीबाबत वंचित बुहजन आघाडीसोबत अद्याप आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. तसा आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही, मग चर्चा कशी करणार? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : पहाटेच्या थपथविधीमागे हात आहे का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
प्रकाश आंबेडकरांची पवारांवर टीका
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. शरद पवार हे भाजपचे आहेत, तुम्ही डोळे झाकून चालला आहात, पण मला याचा अजिबात धक्का बसणार नाही, कारण माझं पूर्वीपासूनच मत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला जयंत पाटील यांनी देखील रोजदार प्रत्युत्तर दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP, Prakash ambedkar, Sharad Pawar, Shiv sena, Uddhav Thackeray