मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: तक्रार करणाऱ्या महिलेला रावसाहेब दानवे म्हणाले 'ये मावशी तुझ्या पाया पडू का?', महिलेनं दिलं सडेतोड उत्तर

VIDEO: तक्रार करणाऱ्या महिलेला रावसाहेब दानवे म्हणाले 'ये मावशी तुझ्या पाया पडू का?', महिलेनं दिलं सडेतोड उत्तर

व्हिडिओमध्ये महिला बोलताना दिसते, की मला बोलण्याचा अधिकार आहे. मला बोलू द्या. मात्र, यावेळी रावसाहेब दानवे या महिलेला म्हणाले, की 'ये मावशी थांब तुझ्या पाया पडू का?'

व्हिडिओमध्ये महिला बोलताना दिसते, की मला बोलण्याचा अधिकार आहे. मला बोलू द्या. मात्र, यावेळी रावसाहेब दानवे या महिलेला म्हणाले, की 'ये मावशी थांब तुझ्या पाया पडू का?'

व्हिडिओमध्ये महिला बोलताना दिसते, की मला बोलण्याचा अधिकार आहे. मला बोलू द्या. मात्र, यावेळी रावसाहेब दानवे या महिलेला म्हणाले, की 'ये मावशी थांब तुझ्या पाया पडू का?'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

औरंगाबाद 21 ऑक्टोबर : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी एक सर्वसामान्य महिला इथे आली आणि आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न करू लागली. यावर मंत्री रावसाहेब दानवे यांनी तुझ्या पाया पडू का? असा सवाल करत महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला.

'शेतकऱ्यांकडे ना झाडी आहेत, ना 50 खोके', सरकारवर टीका करत सुप्रिया सुळेंची कर्जमाफीची मागणी

रावसाहेब दानवे यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये सुरुवातीला एका महिलेचा आवाज येतो. ही महिला आपली समस्या दानवे यांच्यासमोर मांडत आहे. व्हिडिओमध्ये महिला बोलताना दिसते, की मला बोलण्याचा अधिकार आहे. मला बोलू द्या. मात्र, यावेळी रावसाहेब दानवे या महिलेला म्हणाले, की 'ये मावशी थांब तुझ्या पाया पडू का?'

रावसाहेब दानवेंनी अशी प्रतिक्रिया देत महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला . मात्र ही महिला शेवटपर्यंत आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न करत राहिली. रावसाहेब दानवेंच्या या प्रश्नावर उत्तर देताना महिला म्हणाली, की 'माझ्या पाया पडू नका, तुम्हीच आमच्यासाठी मायबाप आहे. या खुर्चीवर आमच्यासाठीच बसला आहात. आम्हाला न्याय द्या.'

Navneet Rana : नवनीत राणा यांना अटक होणार? अजामीनपात्र वॉरंट काढल्याने अडचणीत वाढ

रावसाहेब दानवेंचं विधान -

काही दिवसांपूर्वीच रावसाहेब दानवेंनी निजामांमुळे मराठवाड्याचा विकास झाला नसल्याचं म्हटलं होतं. मराठवड्यात रेल्वेचे नेटवर्क नाही याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही ब्रिटीश नाही, तर निजामच्या अधिपत्याखाली होतो. निजाम होता म्हणूनच आपण मागासलेलो आहोत. कारण त्याला रेल्वेची गरज नव्हती.​​​​​​​ मात्र, आता मोदींचे सरकार आहे, आता विकासाला चालना मिळेल असं ते म्हणाले होते​​​​​​​.

First published:

Tags: BJP, Raosaheb Danve