मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Maharashtra Government : दिवाळीपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Maharashtra Government : दिवाळीपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याचबरोबर अनेक महानगरपालिकांच्याही निवडणुका होणार असल्याने या बदल्या महत्वाच्या मानल्या जात आहेत.

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याचबरोबर अनेक महानगरपालिकांच्याही निवडणुका होणार असल्याने या बदल्या महत्वाच्या मानल्या जात आहेत.

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याचबरोबर अनेक महानगरपालिकांच्याही निवडणुका होणार असल्याने या बदल्या महत्वाच्या मानल्या जात आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 ऑक्टोबर : मागच्या तीन महिन्यापूर्वी सत्तापालट झाल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारकडून पोलीस दलात पहिल्यांदाच बदल्या मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशी चर्चा सुरू असताना. शिंदे सरकारकडून अचानक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याचबरोबर अनेक महानगरपालिकांच्याही निवडणुका होणार असल्याने या बदल्या महत्वाच्या मानल्या जात आहेत.

शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशी चर्चा रंगली होती. याबाबत गृह मंत्रालयाने काल (दि.20) गुरुवारी अचानक आदेश काढले आहेत. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर हे पोलीस दलातील मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 23 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आणि राज्य पोलीस सेवेतील दोन अशा 25 अधिकाऱ्यांच्या नवीन बदल्या करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा : 3 लाख कोटींचा प्रकल्प राज्याबाहेर जाणार? शिंदे-फडणवीसांनी घेतली तातडीची बैठक

25 पोलीस उपआयुक्त, पोलीस अधीक्षकांच्या राज्यभरात वेगवेगळय़ा ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. दरम्यान ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशी चर्चा रंगली होती त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या न होता दुसऱ्या नावांची घोषणा झाल्याने हे बदल मोठे असल्याचे बोलले जात आहे. दिवाळीपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, नागपूरसह अनेक शहरातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

काल याबाबत आदेश काढण्यात आला आहे. यामध्ये मोहितकुमार गर्ग, राजेंद्र दाभाडे, दीक्षितकुमार गेडाम, अजय कुमार बन्सल, अभिनव देशमुख, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, प्रविण मुंडे, जयंत मीना, राकेश कलासागर, पी.पी. शेवाळे, अरविंद चावरिया, दिलीप पाटील-भुजबळ, जी. श्रीधर, अरविंद साळवे, प्रशांत होळकर, विश्वा पानसरे, प्रविण पाटील आणि विजयकुमार मगर या भापोसे अधिकाऱ्यांची, तर राज्य पोलीस सेवेतील निकेश खाटमोडे यांचीही बदली करण्यात आली आहे. 

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या बदली आदेशानुसार, धनंजय कुलकर्णी यांची रत्नागिरी, पवन बनसोड यांची सिंधुदुर्ग, बसवराज तेली यांची सांगली, शेख अस्लम यांची सातारा, अंकित गोयल यांची पुणे ग्रामीण, शिरीष सरदेशपांडे यांची सोलापूर ग्रामीण, राकेश ओला यांची अहमदनगर, एम. राजकुमार यांची जळगाव, रागसुधा आर. यांची परभणी, संदीप सिंह गिल यांची हिंगोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचा : सरकारकडून बळीराजाला दिवाळी गिफ्ट, शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी जमा

श्रीकृष्ण कोकाटे यांची नांदेड, सोमय विनायक मुंडे यांची लातूर, सारंग डी. आवाड यांची बुलढाणा, गौरव सिंह यांची यवतमाळ, संदीप घुगे यांची अकोला, रवींद्रसिंग एस. परदेशी यांची चंद्रपूर, नुरुल हसन यांची वर्धा, निखिल पिंगळे यांची गोंदीया, नीलोत्पल यांची गडचिरोली, संजय बारकुंड यांची धुळे, सचिन पाटील यांची गुन्हे अन्वेषण विभाग औरंगाबाद आणि सिंगुरी आनंद यांची नागपूर ग्रामीण येथे पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, राज्य पोलीस सेवेतील ठाणे शहरचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे प्राचार्यपदी आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पराग मणेरे यांची विशेष सुरक्षा विभागात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Devendra Fadnavis, IPS Officer, Maharashtra government, Maharashtra police