Home /News /maharashtra /

Car Accident : पुणे-बंगळुरू महामार्गावर कार आणि कंटनेरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Car Accident : पुणे-बंगळुरू महामार्गावर कार आणि कंटनेरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथील पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गवर (Pune-Bangalore National Highway) कार व कंटनेरचा भीषण अपघात झाला. (car accident)

कोल्हापूर, 04 जून : सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथील पुणे-बंगळुरूराष्ट्रीय महामार्गवर (Pune-Bangalore National Highway) कार व कंटनेरचा भीषण अपघात झाला. (car accident) या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून जयसिंगपूर निघालेल्या मार्गावर ही दुर्घटना घडली असून गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. पुण्यातून कोल्हापूरकडे येताना काही अंतरावर कासेगावजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अपघातातील मृत जयसिंगपूर (jaysingpur) येथील आहेत. अरिंजय आण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरु अभिनंदन शिरोटे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

कारमधून मृत कुटुंब पिंपरी चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले होते. यावेळी कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे कार रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारमधील 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 2 जागेवर तर 3 जण उपचारासाठी दवाखान्यात दाखल करताना मृत्यू पावले. कासेगावजवळ येथे चारचाकी झालेल्या अपतातील कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. गाडीचा वरील टप व दरवाजे पूर्णपणे तुटलेले होते. वरचा भाग पूर्णपणे उडाला होता.

हे ही वाचा : Weather Update : यंदा monsoon हुलकावणी देण्याची शक्यता, मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?

अरिंजय हे नौदलात नोकरीस होते. याबाबत कासेगाव पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कारमधून (एम एच 14 डी. एन. 6339) मृत कुटुंब पिंपरी - चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले होते. यावेळी कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे कार रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.

महामार्गावर दुसरी मोठी घटना 

दरम्यान, लग्नाला निघालेल्या वऱ्हाड्यांच्या गाडीला भीषण अपघात (road accident) झाला आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात (Pune Bangalore National Highway) झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात चौघांचा मृत्यू झाला आहे. बेळगावहून निप्पाणीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने वऱ्हाड्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

हे ही वाचा : केंद्राचं 5 राज्यांना पत्र आणि राज्य सरकार मास्कसक्तीच्या तयारीत, देश कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर?

मृतकांमध्ये नवरी मुलीचा भाऊ, काका, काकू आणि आजी यांचा समावेश आहे. या अपघातात इतर प्रवासी जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्वजण निपाणी तालुक्यातील बोरगाववाडी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

भरधाव कंटेनरने वऱ्हाड्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडी संपूर्णपणे चक्काचूर झाली. अपघातानंतर जवळपास तासभर मृतक हे गाडीतच अडकून होते. यावरुनच हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, स्तवनिधी येथे लग्नासाठी सर्व वऱ्हाडी निघाले होते. त्याचवेळी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात हा अपघात झाला आहे. अपघातात छाया आदगोंडा पाटील, आदगोंडा बाबू पाटील, महेश देवगोंडा पाटील आणि चंपाताई मगदूप यांचा मृत्यू झाला आहे. महेश देवगोंडा पाटील हा नवरी मुलीचा भाऊ होता.

Published by:Sandeep Shirguppe
First published:

Tags: Car crash, Kolhapur

पुढील बातम्या