Home /News /agriculture /

Weather Update : यंदा monsoon हुलकावणी देण्याची शक्यता, मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?

Weather Update : यंदा monsoon हुलकावणी देण्याची शक्यता, मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?

राज्यात मान्सून (Monsoon in Maharashtra) लवकर येणार अशी हवामान विभागाकडून (imd alert) माहिती देण्यात आली होती.

  मुंबई, 04 जून : राज्यात मान्सून (Monsoon in Maharashtra) लवकर येणार अशी हवामान विभागाकडून (imd alert) माहिती देण्यात आली होती. दरम्यान मान्सून केरळमध्ये (monsoon in Kerala) दाखल होऊन काही जिल्ह्यात पावसाला सुरूवात अशीही माहिती देण्यात आली होती. परंतु मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 2 जूनला सीमेवर दाखल होणार होता परंतु मान्सून पूर्व पावसामुळे (pre monsoon rain) अद्याप मान्सूनचा पाऊस लांबणीवर जात असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत 10 जूनला मान्सूनला (rain in Mumbai) सुरूवात होणार असे बोलले जात होते परंतु मान्सूनचा वेग मंदावल्याने यंदा पावसाला उशीरा सुरूवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (weather update)

  यंदा देशात 96 ते 106 टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे यंदा देशात सगळीच धरणे भरण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा मान्सूनबाबत दुसरा अंदाज जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मान्सून (Monsoon in Maharashtra) कधी दाखल होतो याची सर्वजण वाट पाहू लागले आहेत. पण त्याच दरम्यान स्कायमेटने (Skymet) भारतीय हवामान विभागाने मान्सून आगमनाबाबत केलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे मान्सून खरंच केरळात दाखल झाला आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  हे ही वाचा : LPG अनुदानबाबत नियमात बदल, कोण असणार पात्र? तुम्हाला किती मिळणार अनुदान

  भारतीय हवामान खात्याने सर्व तपासणी न करता मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली. एका दिवसाच्या निरीक्षणाद्वारे घोषणा करणं अयोग्य आहे असं खाजगी हवामान अंदाज वर्तक स्कायमेटने म्हटलं आहे. मात्र, आयएमडीने स्कायमेटचा हा दावा फेटाळून लावला आहे.

  सोमवारी जारी केलेल्या एका निवेदनात, खाजगी हवामान अंदाज वर्तक संस्था असलेल्या स्कायमेटने म्हटले, आयएमडीने रविवारी केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल झाल्याचं म्हटलं. हे सांगताना गेल्या दोन दिवसांपासून वाऱ्याचा वेग आणि ओएलआर यावर आधारित निर्णय घेतला. पण जेव्हा पावसाचा विचार केला जातो तेव्हा सर्वात महत्त्वाचा आणि दृश्यमान याची आकडेवारी दर्शवते की मान्सूनची सुरुवात घोषित करण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता करण्यात आलेली नाही.

  हे ही वाचा : पुणतांबातील आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित, कृषीमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांचा निर्णय

  केरळमध्ये आज 29 मे 2022 रोजी मान्सून सुरू झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान हवामान खात्याकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. मान्सून दाखल होण्यापूर्वी पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याची समुद्रसपाटीपासून  खोली ४.५ किमी पर्यंत असते. दरम्यान हे वाऱ्यांचा वेग वाढून तो 25-35 kmph गेल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. आग्नेय अरबी समुद्र आणि केरळच्या लगतच्या भागात ढगाळ वातावरणात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान केरळमध्ये मागच्या 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली आहे. केरळमध्ये 14 पर्जन्य निरीक्षण केंद्रांपैकी 10 निरीक्षण केंद्रांवर केरळमध्ये मान्सून आल्याचे संकेत दिले आहेत. 10 केंद्रांवर 2.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

  दरम्यान राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. मागच्या काही दिवसांपासूनतापमानात चढ-उतार होताना दिसत आहे. काही प्रमाणात उष्णता वाढली आहे. उद्यापासून (ता. ३०) राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: IMD FORECAST, Monsoon, Mumbai rain, Rain updates, Weather forecast, Weather update

  पुढील बातम्या