मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Lata Mangeshkar : लता मंगेशकर आणि नूरजहाँ यांना No man's land मध्ये का भेटावं लागलं? पाहा Video

Lata Mangeshkar : लता मंगेशकर आणि नूरजहाँ यांना No man's land मध्ये का भेटावं लागलं? पाहा Video

X
Lata

Lata Mangeshkar Death Anniversary : लता मंगेशकर आणि पाकिस्तानी गायिका नूरजहाँ यांना एकदा नो मॅन्स लँडमध्ये भेट घ्यावी लागली होती.

Lata Mangeshkar Death Anniversary : लता मंगेशकर आणि पाकिस्तानी गायिका नूरजहाँ यांना एकदा नो मॅन्स लँडमध्ये भेट घ्यावी लागली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

    साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी

    कोल्हापूर, 6 फेब्रुवारी : स्वर्गीय आवाजाच्या जादूनं प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचा आज ( 6 फेब्रुवारी) पहिला स्मृतीदिन आहे. 6 फेब्रुवारी 2022 रोजी लतादीदी हे जग सोडून गेल्या. त्यानंतरही त्यांच्या आवाजानं अजरामर आहेत. कोल्हापूरमधील ज्येष्ठ पत्रकार आणि लतातदीदींचे निकटवर्तीय उदय कुलकर्णी यांनी या निमित्तानं काही खास आठवणी सांगितल्या आहेत.

    भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी

    लता मंगेशकर यांनी चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्याचे त्यांचा वडिलांना मान्य नव्हते. वडीलांच्या निधनानंतर लता मंगेशकर यांच्यावर घर चालवण्याची जबाबदारी येऊन पडली. तेव्हा तेराव्या वर्ष त्या कोल्हापूरमध्ये आल्या होत्या. आई आणि लहान भावंडांना घेऊन लता मंगेशकर कोल्हापूरच्या मिरजकर तिकटी येथील कारेकर यांच्या घरात राहात असत.  भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्या पायाला झालेली जखम बरी होत नव्हती. त्यावेळी आशा भोसले आणि हृदयनाथ यांना कोल्हापूरच्या विद्यापीठ हायस्कूल शाळेत घातले होते. तिथे त्यांना रोज सोडायला त्यांच्या लतादीदी जात असत,' असे कुलकर्णी यांनी सांगितले.

    लता मंगेशकर यांनी वसंत जोगेळकर यांच्या  'किती हसाल' या सिनेमासाठी पार्श्वगायन केले होते. पण, वडील डील दीनानाथ मंगेशकर यांच्या विरोधामुळे ते कापले गेले होते. दत्ता डावजेकर यांनी मास्टर विनायक यांच्या चित्रपटासाठी संगीत दिले होते. त्यात बाल कलाकार म्हणून लता मंगेशकर यांनी भूमिका देखील केली आणि गायन देखील केले.

    Lata Mangeshkar: जयप्रभा स्टुडिओबाबत लतादीदींनी व्यक्त केली होती 'ही' इच्छा, Video

    नूरजहाँशी मैत्री

    कोल्हापुरातील शालिनी स्टुडिओत मास्टर विनायक यांच्या काही हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण देखील होत असे. या ठिकाणी एकदा एका चित्रपटासाठी नूरजहाँ आपला नवरा आणि लहान मुलाला घेऊन आल्या होत्या. त्याकाळी नूरजहाँ चांगल्याच लोकप्रिय होत्या. लता मंगेशकरांवरही त्यांच्या गाण्याचा प्रभाव होता.

    नूरजहाँ फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेल्या. त्यानंतरही लतादीदी आणि त्यांची मैत्री टिकून होती. एकदा नूरजहाँ यांनी लतादीदींना फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे सहज भेट शक्य नव्हती. पण, दोघींनी त्यावरही तोडगा काढला.

    लता मंगेशकरांच्या आठवणींचा खजिना, पाहा आजवर कधीही न पाहिलेले Photos

    'लता मंगेशकर आणि नूरजहाँ दोघींनीही आपल्या देशाच्या बॉर्डरपर्यंत गाडीनं यायचं त्यानंतर बॉर्डरवर असलेल्या नो मॅन्स लँडमध्ये एकमेकींची भेट घ्यायची असं त्यांचं ठरलं होतं. त्याप्रमाणे ती भेट झाली. लता मंगेशकर आणि नूरजहाँ यांच्या घट्ट मैत्रीची सुरूवात कोल्हापुरातच झाली होती,' अशी आठवण कुलकर्णी यांनी सांगितली.

    कोल्हापूरशी खास नातं

    लता मंगेशकर यांच्या पार्श्वगायनाची सुरुवात  कोल्हापुरातच झाली.  त्यांच्या पार्श्वगायनाचा रौप्य महोत्सव जेव्हा झाला, तेव्हा कोल्हापूरच्या खासबाग मैदानात वि. स. खांडेकर यांच्या उपस्थितीत लता दीदींचा सत्कार करण्यात आला होता. शिवाजी विद्यापीठाकडून 1978 साली डीलिट पदवी देखील बहाल करण्यात आली होती. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी 1980 च्या दशकात भारत जोडो यात्रा काढली होती. तेव्हा बाबा आमटे कोल्हापूरमध्ये आले होते. कोल्हापूरमध्ये बाबांशी झालेल्या भेटीनंतर लता मंगेशकर भारत जोडो यात्रेतही सहभागी झाल्या होत्या.

    लतादीदींनी 'या' शहरातून केली होती गायनाची सुरूवात, पाहा Video

    कोल्हापूरच्या  छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालया बाबतची आठवणही कुलकर्णी यांनी सांगितली.  शिवाजी स्टेडियमच्या बांधकामात निधी उभारणीसाठी लतादीदींनी कोल्हापूरमध्ये गाण्याचा कार्यक्रम घेतला होता. जमा झालेल्या निधीतून शिवाजी स्टेडियमचं काही बांधकाम पूर्ण झालं. तर कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले. त्यावेळी लतादीदी राज्यसभा सदस्य होत्या. तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या विनंतीवरून लतादीदींनी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृह बांधणीसाठी खासदार निधी दिला होता.

    लतादीदी परदेश दौरे करून आल्या तरी निवांत राहण्यासाठी नेहमी कोल्हापूरमध्ये येत असत. सुरूवातीला त्या जयप्रभा स्टुडिओमध्येच राहायच्या. त्यानंतर पन्हाळवरी बंगल्यात राहत असत.

    First published:

    Tags: Entertainment, Kolhapur, Lata Mangeshkar, Local18