जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Lata Mangeshkar : लतादीदींनी 'या' शहरातून केली होती गायनाची सुरूवात, पाहा Video

Lata Mangeshkar : लतादीदींनी 'या' शहरातून केली होती गायनाची सुरूवात, पाहा Video

Lata Mangeshkar : लतादीदींनी 'या' शहरातून केली होती गायनाची सुरूवात, पाहा Video

Lata Mangeshkar Death Anniversary : स्वर्गीय आवाजानं सारं विश्व मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांनी पहिला स्टेज परफॉर्मन्स कुठं केला होता हे तुम्हाला माहिती आहे का?

  • -MIN READ Solapur,Solapur,Maharashtra
  • Last Updated :

    अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर 6 फेब्रुवारी : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज (6 फेब्रुवारी) पहिला स्मृतीदिन. लता दीदींच्या आवाज साक्षात सरस्वती देवीचा अधिवास होता अशी अनेकांची श्रद्धा होती. अनेक भाषांमधून हजारो अविस्मरणीय गाणी लतादीदींनी गायली. या गाण्यांचे अनेक कार्यक्रम त्यांनी जगभर केले. लतादीदींनी हा सर्व अविस्मरणीय ठेवा त्यांच्या रसिकांसाठी ठेवला आहे. स्वर्गीय आवाजानं सारं विश्व मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांनी पहिला स्टेज परफॉर्मन्स कुठं केला होता हे तुम्हाला माहिती आहे का? 1938 साली पहिला कार्यक्रम लता मंगेशकर यांनी त्यांच्या स्टेज परफॉर्मन्सची सुरूवात सोलापूरमध्ये केली होती. 1938 साली झालेल्या संगीत मैफिलीसाठी लतादीदी त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्यासोबत सोलापूरमध्ये आल्या होत्या.  तेव्हा 9 वर्षांच्या असताना लतादीदींनी खंबावती राग सोलापूरकरांसमोर सादर केला होता. Lata Mangeshkar Death Anniversary: दीदींच्या करिअरमधील टॉप 10 गाणी, जी आजही लोकांच्या मनात जिवंत लतादीदींनी त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये या संदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त सरस्वती चौकातील निरागस थिएटरमध्ये मंगेशकर परिवारातील जवळच्या व्यक्तींनी काही कार्यक्रम आयोजित केले होते. औरंगाबादचे फोटोग्राफर कधीही विसरणार नाहीत ‘तो’ दिवस, 24 तासांमध्ये केला होता विक्रम, Video लता मंगेशकर यांनीही 29 मार्च 2021 रोजी एक ट्विट करत सोलापूरमधील पहिल्या मैफिलीची आठवण सांगितली होती. त्यावेळी त्यांनी एक अत्यंत जुना फोटो देखाल शेअर केला होता.  ‘आज आमचे परिचित उपेंद्र चिंचोरेजी यांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की, तुम्ही पहिला क्लासिकल परफॉर्मन्स हा वडिलांसोबत 9 सप्टेंबर 1938 साली सोलापूरमध्ये दिला होता. हा फोटो त्या वेळी शो पब्लिसिटीसाठी घेण्यात आला होता. खरंच वाटत नाही की, गाण्याला सुरुवात करुन 83 वर्ष पूर्ण झाले.’ असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं होतं.

    News18

    गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा पहिला स्टेज परफॉर्मन्स ऐकण्याचा सन्मान मिळाला हे सोलापूरकरांचं भाग्य आहे. लतादीदींचं कोणतंही गाणं ऐकलं तरी मनाला शांतता लाभते. लतादीदींचा आवाज पहिल्यांदा ऐकणारे सोलापूरकर किती भाग्यवान आहेत, याचा विचार करा, अशी भावना सोलापूरचे ज्येष्ठ ध्वनीमुद्रिका संग्रहाक जयंत राळेरासकर यांनी व्यक्त केली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात