कोल्हापूर, 01 डिसेंबर : कोल्हापूर शहरात दहशतीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून दारू पिऊन धिंगाणा, खून, चोऱ्या, मारामीच्या घटनेत वाढ झाल्याने नागरिकांसह सर्वांचीच कोंडी झाली आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी खुलेआम भर चौकात हुक्का आणि वाहने लावून दहशत माजवल्याची घटना ताजी असताना पुन्हा एक प्रकार समोर आला आहे. यामुळे कोल्हापूर पोलिसांनी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना चांगलाच चोपला आहे. या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
#कोल्हापूर : दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मद्यपींना पोलिसांनी चोपलं pic.twitter.com/ZFuABpd9bI
— News18Lokmat (@News18lokmat) December 1, 2022
कोल्हापूर शहरातील व्हिनस कॉर्नर हा चौक मुख्य मानला जातो यामुळे या चौकात 24 तास रहदारी असते यामुळे हा चौक नेहमी गजबजलेला असतो. दरम्यान या व्हिनस कॉर्नर चौकात काल रात्री दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मद्यपीना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.
हे ही वाचा : श्रद्धासोबत असं का केलं? आफताब आज तोंड उघडणार, मोठी माहिती समोर
व्हीनस कॉर्नर परिसरात एका बारच्या बाहेर नेहमीच दारू पिणाऱ्यांचा उच्छाद होता. स्थानिक नागरिकांनी याची पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार शाहुपूरी पोलिसांनी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्याना चांगलाच चोप दिला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील व्हिनस कॉर्नर चौकात काल रात्रीच्या सुमारास काही मद्यपी दारू पिऊन धिंगाणा घालत होते. दरम्यान या चौकात नेहमी असा धिंगाणा सुरू असल्याने तेथील नागरिक चांगलेच वैतागले होते. काल रात्रीही असाच प्रकार सुरू असल्याने नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. हा धिंगाणा सुरू असतानाच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
हे ही वाचा : 5 वर्ष तयारी केली पण सैन्य भरतीचं स्वप्न अपूर्णच राहिलं; अग्निवीर भरतीत अपयश आल्याने टोकाचं पाऊल
यानंतर व्हिनस कॉर्नर चौकात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मद्यपीना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. व्हीनस कॉर्नर परिसरात एका बारच्या बाहेर नेहमीच दारू पिणाऱ्यांचा उच्छाद होता. स्थानिक नागरिकांनी याची पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्याना चांगलाच चोप दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Kolhapur, Police, Police action