बसमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला व्यक्ती; बॅगमधील सामान पाहून पोलिसांनाही बसला धक्का
शिरोली येथील रमजान उर्फ आसिफ देसाई या तरुणानं सैन्यभरतीचा ध्यास घेऊन गेली 5 वर्षे शिरोली येथील मैदानावर सराव सुरू ठेवला होता. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर सुरू असलेल्या अग्निवीर भरतीमध्ये तो आपलं नशीब आजमावण्यासाठी उतरला होता. बुधवारी मध्यरात्री त्याची शारीरिक क्षमता चाचणी पार पडली. धावण्याच्या क्रीडा प्रकारात तो अपयशी ठरला. त्यानंतर रात्री अडीच वाजता तो घरी गेला.
सकाळी त्याच्या गावातील मित्र आसिफला भेटण्यासाठी आले होते. कुटुंबीयांनी आसिफला आवाज दिला. त्यानंतर मित्रमंडळींनीही त्याच्या रूमचा दरवाजा ठोठावून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आसिफच्या खोलीमधून प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर पालकांच्या सांगण्यानुसार मित्रांनी रूमचा दरवाजा तोडला. त्यावेळी आसिफनं सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसून आलं.
क्षणभराचा आनंद जीवावर बेतला; झोका खेळताना जळगावातील 18 वर्षीय तरुणीसोबत घडलं भयानक
ही घटना बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिसांत झाली आहे. एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर आभाळ कोसळलं आहे. तर मित्रांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिसांत झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Suicide