मुंबई, 01 डिसेंबर : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवीन काहीतरी घडत आहे. आज (दि.01) श्रद्धाच्या हत्येतील आरोपी आफताबची नार्को टेस्ट होणार आहे. या नार्को चाचणीनंतर खुनाच्या संबंधित न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबला नार्को टेस्टमध्ये जवळपास 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यादृष्टीने पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. आफताबवरील हल्ल्यानंतर त्याच्या सुरक्षेसाठीही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. याआधी आफताबची पॉलीग्राफ चाचणी पूर्ण झाली आहे. दरम्यान आज (दि. 01) सकाळी दहाच्या सुमारास त्याची नार्को चाचणी केली जाणार आहे.
नार्को चाचणीची तयारी सुरू?
आज (दि. 01) दिल्ली पोलीस सकाळी साडेसात वाजता आफताबला तिहार जेलमधून आंबेडकर रुग्णालयात दाखल होणार आहेत. दरम्यान आफताबवर हल्ला झाल्याने त्याची सुरक्षा कडक असणार आहे. आंबेडकर रुग्णालयाबाहेर दिल्ली पोलिसांची एक फौजही तैणात असणार आहे. आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर यापूर्वी हल्ला झाला होता म्हणून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. आफताबवर हल्ला केलेल्या हल्लेखोरांनी आपण हिंदू सेनेचे असल्याचे सांगितले. त्याला श्रद्धाच्या मारेकऱ्याचा बदला घ्यायचा होता, असे त्याने सांगितले.
हे ही वाचा : बसमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला व्यक्ती; बॅगमधील सामान पाहून पोलिसांनाही बसला धक्का
आंबेडकर रुग्णालयात पोहोचल्यानंतर आफताबची वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून आफताबची नार्को टेस्ट सुरू होईल.
आफताब सध्या तिहार जेलमध्ये आहे त्याची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर तो अतिषय सामान्य असल्याचा दाखवत आहे. तो जेलमध्ये आल्यानंतर जेलच्या नियमानुसार जेवण घेऊन कोणतीह गैरकृत्य केलं नसल्याचे जेल प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. आफताब त्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी दोन ट्रायल कैदीही आहेत. त्याच्यासोबत असलेले दोघांनी चोरी केल्याने अटकेत आहेत.
पॉलीग्राफ चाचणीत आफताबने खुनाची दिली कबुली
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या दिवशी झालेल्या पॉलीग्राफ टेस्टमध्ये आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली. मीच श्रद्धाला मारले असे तो म्हणाला होता. यासोबतच आफताबने या हत्येचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचेही सांगितले होते.
हे ही वाचा : प्रेयसीने गर्भवती असल्याचं सांगताच तरुणाला बसला धक्का, सेल्फी पाठवून घडलं भयंकर!
नार्को टेस्टमध्ये आरोपी आफताब अनेक गुपिते उघड करण्याची शक्यता आहे. आफताबने अनेक गोष्टींचा खुलासा केला नसल्याने त्याच्याकडून अजून काही मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Delhi Police, Murder news