मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'खड्ड्याकडे दुर्लक्ष का केलं?'; कोल्हापुरात अपघातात आईचा मृत्यू झाल्याने मुलावरच गुन्हा दाखल

'खड्ड्याकडे दुर्लक्ष का केलं?'; कोल्हापुरात अपघातात आईचा मृत्यू झाल्याने मुलावरच गुन्हा दाखल

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

महानगरपालिकेतील एका मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या अभियंत्याच्या आईचा खड्ड्यात पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी याचं खापर मृत महिलेच्या अभियंता असलेल्या मुलावरच फोडलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

ज्ञानेश्वर साळुंखे, कोल्हापूर 30 ऑक्टोबर : कोल्हापूर जिल्ह्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात काहींचा जीवही जातो. मात्र, आता कोल्हापूरातून एक अतिशय अजब प्रकार समोर आला आहे. यात खड्ड्याकडे दुर्लक्ष करत गाडी चालवल्याने आईचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुलावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Halloween Party मधील दुर्घटनेत 149 जणांचा मृत्यू, श्वास कोंडल्याने आणि हार्ट अटॅकने घेतले शेकडो जीव

महानगरपालिकेतील एका मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या अभियंत्याच्या आईचा खड्ड्यात पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. महानगरपालिकेच्या या अभियंत्याला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने आपल्या आईचा जीव गेलाने चांगलाच मानसिक धक्का बसला आहे. मात्र, रस्ता दुरुस्त करून या घटना टाळण्याऐवजी पोलिसांनी याचं खापर मृत महिलेच्या अभियंता असलेल्या मुलावरच फोडलं आहे.

याप्रकरणात पोलिसांनी अभियंता मुलावरच गुन्हा दाखल केला आहे. खड्ड्याकडे दुर्लक्ष करत गाडी चालवल्यानेच अभियंत्याच्या आईचा मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. खड्ड्यातून वाट काढत गाडी कशी चालवायची? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

कार पार्किंगच्या वादात गेला माजी पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा जीव; हाणामारीत मृत्यू

अपघात झाल्यानंतर महापालिकेने मुरुम टाकून हा खड्डा बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक करणारे लोक जीव मुठीत घेऊन वाहनं चालवत असतात. अशातच पोलिसांनी अभियंत्यावरच याचं खापर फोडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

First published:

Tags: Kolhapur, Major accident, Road accident