सिऊल, 29 ऑक्टोबर : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पार्टीत मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला. दक्षिण कोरियात आऊटडोर नो मास्क हॅलोविन पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी देशाची राजधानी सिऊलमध्ये लोकांची गर्दी झाली. पार्टीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 149 अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण कोरियाची राजधानी सिऊलमध्ये खचाखच भरलेल्या हॅलोविन उत्सवात झालेल्या गर्दीत किमान 149 लोक ठार आणि डझनभर जखमी झाले आहेत, असं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. योनहाप न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, या चेंगराचेंगरीदरम्यान अनेकांना हृदयविकाराचा झटका आला आणि अनेकांचा श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मृत्यू झाला.
Death video in Itaewon, South Korea Cause of death: stampede pic.twitter.com/UZyCAkxmRK
— Hell Chosun (@dRwjTWgcDffvTWz) October 29, 2022
या घटनेत मृत्यू झालेल्यांची तात्काळ ओळख पटवण्यास दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांनी अधिका-यांना सांगितलं आहे. अनेकांची अजूनही ओळख पटलेली नाही. रविवारी सकाळी एका अपडेटमध्ये अग्निशमन प्रमुख चोई सेओंग-बम यांनी सांगितलं की, किमान 149 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 76 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 19 जण गंभीर जखमी झाले, तर 57 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
श्वास कोंडला, हार्ट अटॅक आला! खरोखर भयावह ठरली Halloween Party; काय घडलं पाहा 5 VIDEO
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोलच्या मुख्य पार्टी केंद्र असलेल्या हॅमिल्टन हॉटेलच्या दिशेने जात असलेल्या लोकांची गर्दी एका चिंचोळ्या गल्लीत घुसली आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेकांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी झाले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडिओही समोर आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Shocking news