मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Murder Case : कोल्हापुरात हत्येचं सत्र सुरूच, महिलेचा निर्जनस्थळी खून, कारण अद्यापही अस्पष्ट

Kolhapur Murder Case : कोल्हापुरात हत्येचं सत्र सुरूच, महिलेचा निर्जनस्थळी खून, कारण अद्यापही अस्पष्ट

कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. मागच्या दोन दिवसांंपूर्वी तिहेरी हत्याकांडाचे वृत्त ताजे असतानाच आता एका महिलेचा खून करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. मागच्या दोन दिवसांंपूर्वी तिहेरी हत्याकांडाचे वृत्त ताजे असतानाच आता एका महिलेचा खून करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. मागच्या दोन दिवसांंपूर्वी तिहेरी हत्याकांडाचे वृत्त ताजे असतानाच आता एका महिलेचा खून करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 1 ऑक्टोंबर : कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. मागच्या दोन दिवसांंपूर्वी तिहेरी हत्याकांडाचे वृत्त ताजे असतानाच आता एका महिलेचा खून करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा- शिरोली दुमाला मार्गावर असलेल्या पाडळी खुर्द गावातील एका शेतात महिलेला मारण्यात आले आहे. धारदार शस्त्राने डोक्यात वार करून महिलेचा खून केल्याची काल (दि.30) शुक्रवारी घडली. आरती अनंत सामंत (वय 45, रा. पंचगंगा हॉस्पिटलजवळ, शुक्रवार पेठ) असे या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशीरा करवीर पोलिसांकडून तपास सुरू होता या दरम्यान  शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील एका मांत्रिकासह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. खुनाच्या नेमक्या कारणांसह हल्लेखोरांची नावेही लवकरच निष्पन्न होतील, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून माहिती देण्यात आली आहे. हल्लेखोरांसह खुनाचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. आर्थिक वाद, गुप्तधन अथवा अन्य कारणातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. खुनानंतर साडेचार लाखांचे 9 तोळे दागिनेही हल्लेखोरांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : कोल्हापूर हादरले! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलांचा बापाने केला खून

कोल्हापूरपासून काही अंतरावर असलेल्या पाडळी खुर्द येथील राजवर्धन पाटील यांच्या शेतात निर्जन स्थळी महिलेचा खून करण्यात आला होता. दरम्यान काही ग्रामस्थ शेताकडे जात असताना अनोळखी महिलेचा मृतदेह दिसल्यानंतर माहिती देण्यात आली. यावर करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजय गोर्ले, सहायक निरीक्षक सूरज बनसोडेंसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पर्समध्ये असलेल्या आधार कार्डवरून खून झालेली महिला शुक्रवार पेठ येथील पंचगंगा हॉस्पिटल परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. हल्लेखोरांनी मातीची वीट, दगड अथवा धारदार शस्त्राने डोक्यावर वर्मी हल्ला केल्याने अतिरक्तस्राव होऊन महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले ही महिला आंबेवाडी (ता. करवीर) येथे राहत होती. 2006 मध्ये पतीच्या निधनानंतर दोन मुलींसह ती शुक्रवार पेठ येथील आईकडे राहायला आली. एका मुलीचा विवाह झाला असून, दुसरी मुलगी पुण्याला शिक्षण घेत आहे. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास आरती दुचाकी घेऊन घराबाहेर पडली. ती रात्री उशिरापर्यंत आली नाही. नातेवाईकांनी शोध घेतला तेव्हा मोबाईलही स्विच ऑफ होता.

ओळखीच्या व्यक्तीसमवेत बोलत असतानाच पाठीमागील बाजूने हल्लेखोराने महिलेच्या डोक्यावर वर्मी हल्ला केल्याचे दिसून येते. यावेळी झटापट झाल्याचेही व्रण आहेत. हातातील सोन्याच्या चार पाटल्या, मंगळसूत्र असे 9 तोळे दागिनेही संशयितांनी लंपास केल्याचे पोलिस निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले. महिलेच्या हातावर व शरीरावर खरचटल्याचेही व्रण आहेत.

हे ही वाचा : कोल्हापुरात भर चौकात कुख्यात गुंडाचा थरारक पाठलाग करत दगडाने ठेचून खून

सारिका निरंजन दीक्षित (रा. शुक्रवार पेठ) यांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाची फिर्याद दिली आहे. दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोली पुलाची येथील 35 वर्षीय एका मांत्रिकासह तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संबंधित मांत्रिकाबरोबर आठवड्यापूर्वी आरतीचा आर्थिक कारणातून वाद झाला होता, अशीही माहिती चौकशीतून पुढे आल्याचे सांगण्यात आले.

First published:

Tags: Crime, Crime news, Kolhapur, Murder, Murder news