मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Kagal Murder Case : कोल्हापूर हादरले! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलांचा बापाने केला खून

Kolhapur Kagal Murder Case : कोल्हापूर हादरले! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलांचा बापाने केला खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्यानंतर पोटच्या दोन मुलांचाही निर्घृण खून करून नराधम बाप पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. (Kolhapur Kagal Murder Case)

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्यानंतर पोटच्या दोन मुलांचाही निर्घृण खून करून नराधम बाप पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. (Kolhapur Kagal Murder Case)

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्यानंतर पोटच्या दोन मुलांचाही निर्घृण खून करून नराधम बाप पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. (Kolhapur Kagal Murder Case)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 28 सप्टेंबर : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही महिन्यांपासून खूनाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेल्या कागलमध्ये चारित्र्यांच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्यानंतर पोटच्या दोन मुलांचाही निर्घृण खून करून नराधम बाप पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे.

'मी बायको आणि दोन पोरांना संपवलेय... मला आत घ्या,' असे म्हणत निर्विकार चेहऱ्याने पोलिसांत हजर झाला. कागल येथील या तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. गायत्री प्रकाश माळी (वय 30), कृष्णात माळी (10) आणि आदिती माळी (16) अशी मृतांची नावे असून, प्रकाश बाळासो माळी (36) असे संशयिताचे नाव आहे. संशयीत प्रकाश हा कागल शहरातील पूर्वी होमगार्ड म्हणून काम करत होता. त्याने ती नोकरी सोडून एका साखर कारखान्यात नोकरी करतो. प्रकाश हा कागल शहारातील कोष्टी गल्लीतून गणेशनगर येथे राहायला आला आहे.

हे ही वाचा : गुडबाय’ असा व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज टाकला, प्रेयसीचा खून करत स्वत: घेतले विष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी प्रकाश आणि पत्नी गायीत्री हिच्याशी वाद झाला. त्यातूनच प्रकाशने गायत्रीचा गळा आवळून खून केला व तिचा मृतदेह आतील खोलीत लपवून ठेवला. पाच वाजता मुलगा कृष्णा शाळेतून घरी आला तेव्हा प्रकाश बाहेरच्या खोलीत बसला होता. कृष्णा आतील खोलीत गेल्यावर त्याला आई जमिनीवर पडलेली दिसली. त्याने आईला उठवण्याचा प्रयत्न केला; पण ती जागची हलत नव्हती. आईसोबत आपल्या वडिलांनी काही तरी केले आहे, हे लक्षात आल्यावर कृष्णा जोरजोरात रडू लागला. त्यामुळे संतापलेल्या प्रकाशने कृष्णाचाही गळा आवळून खून केला.

कृष्णाचा मृतदेह त्याने त्याच खोलीत ठेवला आणि पुन्हा बाहेरच्या खोलीत येऊन जणू काही घडलेच नाही, अशा अविर्भावात बसला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास आदिती घरी परतली. आतील खोलीत आई आणि भावाचा मृतदेह बघून तिने हंबरडा फोडला. प्रकाशने तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला; पण आदिती ओरडू लागली. त्यामुळे प्रकाशने तिलाही गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला; पण ती हिसडा मारून निसटली. त्यामुळे प्रकाशने स्वयंपाकघरातील वरवंटा तिच्या डोक्यात घातला. आदिती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यावर पुन्हा प्रकाश बाहेरच्या खोलीत येऊन बसला.

रात्री ९ च्या सुमारास प्रकाश घरातून बाहेर पडला आणि कोष्टी गल्लीतील आपल्या भावाकडे गेला. 'मी बायको आणि दोन मुलांना मारून आलोय, ' असे त्याने भावाला सांगितले; पण भावाला तो मस्करी करतोय, असे वाटल्याने त्याने त्याला हाकलून लावले. तेथून प्रकाश कागल पोलिस ठाण्यात आला.

हे ही वाचा : Kolhapur Police : कोल्हापूर पोलीस प्रमुखांनी PFI चा हस्तक मौला मुल्लाविषयी दिली महत्वाची माहिती

कागल पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी होती. त्यामुळे पोलिसांनी बाहेरचे गेट बंद केले होते. प्रकाश या गेटवर गेला आणि दरवाजा उघडा, असे पोलिसांना सांगू लागला. पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी असल्याने वातावरण तंग होते. त्यामुळे पोलिसांनी प्रकाशला हटकले. 'दार उघडा आणि मला आत घ्या... मी बायको आणि दोन पोरांना संपवलंय...' असे त्याने पोलिसांना सांगितले. तरीही पोलिसांचा त्यावर विश्वास बसला नाही. अखेर पोलिसांनी त्याला आत घेतले आणि त्याच्याकडून अधिक माहिती मिळवली. घटनास्थळाचे दृश्य पाहून पोलिस हादरले. एकाच खोलीत तिघांचे मृतदेह पडले होते.

First published:

Tags: Crime, Crime news, Kolhapur, Police