मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Crime Murder : कोल्हापुरात भर चौकात कुख्यात गुंडाचा थरारक पाठलाग करत दगडाने ठेचून खून

Kolhapur Crime Murder : कोल्हापुरात भर चौकात कुख्यात गुंडाचा थरारक पाठलाग करत दगडाने ठेचून खून

कोल्हापुरात काल रात्री एका कुख्यात गुंडाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. थरारक पद्धतीने हा खून करण्यात आल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. (Kolhapur murder crime)

कोल्हापुरात काल रात्री एका कुख्यात गुंडाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. थरारक पद्धतीने हा खून करण्यात आल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. (Kolhapur murder crime)

कोल्हापुरात काल रात्री एका कुख्यात गुंडाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. थरारक पद्धतीने हा खून करण्यात आल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. (Kolhapur murder crime)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 25 सप्टेंबर : कोल्हापुरात काल रात्री एका कुख्यात गुंडाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. थरारक पद्धतीने हा खून करण्यात आल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. दौलतनगरमधील गुंडाचा यादवनगरमध्ये पाठलाग करत दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल(दि. 24) शनिवारी रात्री उशिरा घडली. चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय 25) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू जप्त केला आहे.

कोल्हापूर शहराती कुख्यात गुंड असलेला चिन्या हळदकर याचा काल रात्री खून करण्यात आला. दरम्यान या घटनेने राजारामपूरी परिसरासह शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. चार मारेकर्‍यांनी थरारक पाठलाग करून त्याला दगडाने ठेचले. यादवनगर येथील महावितरण कार्यालयासमोरील चौकात ही थरारक घटना घडली.

हे ही वाचा : देहव्यापार करणारी प्रेयसी दारू पिऊन घरी आली, प्रियकराने आवळला गळा, मृतदेह घेऊन निघाला कर्नाटकला पण...

खुनाच्या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हल्ल्यानंतर चौघाही संशयितांनी पलायन केले आहे. दरम्यान या घटनेमुळे कोल्हापूर शहरात पुन्हा गँगवॉर फोफावण्याची शक्यता आहे. पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11 च्या सुमारास चिन्या हळदकर आणि संशयित यांच्यात दौलतनगर परिसरात वादावादी झाली. ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वादावादीतून चौघांनी चिन्यावर जीवघेणा हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी तो यादवनगरच्या दिशेने पळाला. हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याला  महावितरण कार्यालयाजवळ गाठले. दरम्यान चौघांनी मिळून त्याला मारल्याने तो रस्त्यातच पडला. त्यानंतर हल्लेखोरांनी दगडाने डोके ठेचून त्याचा खून केला.

चिन्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून हल्लेखोर तेथून पसार झाले. घटनेची वर्दी मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मारेकर्‍यांच्या शोधासाठी परिसरात मध्यरात्रीपर्यंत नाकाबंदी करण्यात आली होती. खुनाची घटना कळताच त्याच्या समर्थकांसह नातेवाईकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा ठावठिकाणा लागू शकला नव्हता.

हे ही वाचा : धक्कादायक! 120 मुला-मुलींचा एकाच ट्रकमधून प्रवास, गोंदियात खळबळ

चिन्या हळदकरसह त्याच्या भावाने परिसरात मोठी दहशत निर्माण केली आहे. विविध गंभीर गुन्ह्यांत चिन्याला यापूर्वी अटक झाली होती. 15 दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटला होता. त्यानंतरही त्याने पुन्हा दहशत माजवण्यास सुरुवात केली होती. त्याच्याविरुद्ध मारामारी, खुनीहल्ला, खंडणी वसुलीचे 10 ते 12 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी तडीपारीचीदेखील कारवाई झाली होती, असे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.

First published:

Tags: Crime, Crime news, Gang murder, Kolhapur, Murder news