जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur Couple Suicide : ‘गुडबाय’ असा व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज टाकला, प्रेयसीचा खून करत स्वत: घेतले विष

Kolhapur Couple Suicide : ‘गुडबाय’ असा व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज टाकला, प्रेयसीचा खून करत स्वत: घेतले विष

Kolhapur Couple Suicide : ‘गुडबाय’ असा व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज टाकला, प्रेयसीचा खून करत स्वत: घेतले विष

‘गुडबाय’ असा नातेवाईकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज टाकून तरूणाने एका मुलीचा खून केला आहे. तर स्वत: मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. (Kolhapur Couple Suicide)

  • -MIN READ Kolhapur,Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 21 सप्टेंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये असलेल्या गिरोली घाटात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘गुडबाय’ असा नातेवाईकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज टाकून तरूणाने एका मुलीचा खून केला आहे. तर स्वत: मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. लिंगनूर (ता. कागल) मधील तरूणाने त्याच्या नात्यातील खोतवाडी (इचलकरंजी) मधील तरूणीचा गिरोली घाटात खून केला. यानंतर त्याने विष प्राशन केले. ही घटना काल (दि. 21) मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. ऋतुजा प्रकाश चोपडे (वय 21) असे मृत तरूणीचे नाव आहे. संशयित तरूण कैलास आनंदा पाटील (वय 28) याच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू होते.

जाहिरात

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, ऋतुजा आणि कैलास हे नात्यातील असल्याने एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या लग्नाची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती. परंतु लग्नाला काही नातेवाईकांचा विरोध होता. त्यावर कैलास याने ऋतुजा हिला मंगळवारी भेटण्यास बोलविले. तिला चारचाकीतून घेवून तो गिरोली घाटात गेला. त्याठिकाणी त्याने तिचा खून केला. त्यानंतर त्याने दोघांच्या नातेवाईकांच्या असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ‘गुडबाय’ असा मेसेज टाकून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

हे ही वाचा :  कोल्हापुरात ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दारूचा सुळसुळाट लाखाेंची दारू पकडली

तो मेसेज वाचून तरूणीच्या नातेवाईकांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिस मोबाईलचे लोकेशन तपासून गिरोली घाटाकडे रवाना झाले. पेठवडगाव आणि कोडोली पोलीसांकडून घटनास्थळी तपास सुरू होता.

कैलास याला उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कैलास याच्या घरची परिस्थिती सामान्य आहे. तो फरशी बसविण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल पुरवण्याचे काम करतो. ऋतुजा ही बी. एस्सी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती.

जाहिरात

हे ही वाचा :  शारीरिक संबंधांना तरुणीचा नकार, नाशिकमधील पीडितेचे अश्लिल फोटो व्हायरल करून विनयभंग

कैलास याने मंगळवारी सकाळी कोल्हापूरला येताना त्याच्या मित्रांना मी आज जीवन संपवणार आहे. माझा गावात मोठा फोटो लावा असे सांगितले होते. मोबाईलवर त्याने ‘मला माफ करा. मी जात आहे. गुडबाय लाईफ’ स्टेटसही ठेवला होता, अशी माहिती पोलीसांकडून मिळाली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात