जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur Crime Hupari : कालव्यात मृतदेहासह आढळली जळालेली कार, नेमकं काय प्रकरण? कोल्हापूर हादरलं

Kolhapur Crime Hupari : कालव्यात मृतदेहासह आढळली जळालेली कार, नेमकं काय प्रकरण? कोल्हापूर हादरलं

Kolhapur Crime Hupari : कालव्यात मृतदेहासह आढळली जळालेली कार, नेमकं काय प्रकरण? कोल्हापूर हादरलं

कोल्हापूरातील हुपरी येथे कार जळालेल्या अवस्थेत असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 11 मार्च : कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या सहकारी साखर कारखान्याजवळील कालव्याच्या पाण्यात मारुती अल्टो कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली आहे.

रम्यान वाहनात एक मृतदेहही आढळून आला आहे. ही कार जळालेल्या अवस्थेत असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू केला आहे.

बँक लुटायला गेला अन् चोरले 82 रूपये; मग स्वतःच पोलिसांना फोन करून अटकेसाठी केली विनंती, कारण…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील माळरानावर कालवा आहे. आज (शनिवार) सकाळी पोलिसांना निनावी फोनद्वारे काही दिवसांपूर्वी कार कालव्यात पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी सपोनि पंकज गिरी, पीएसआय गणेश खराडे, रावसाहेब हजारे सत्तापा चव्हाण आदी या ठिकाणी दाखल झाले.  

जाहिरात

त्यांनी क्रेनच्या साहाय्याने कार पाण्याबाहेर काढली. कार जळालेल्या अवस्थेत असुन, कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

होळीसाठी भारतात आलेली जपानी तरुणी; तरुणांनी घेरून केलं धक्कादायक कृत्य, तिघांना अटक..VIDEO

या भागातील एक तरुण गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या प्रकरणाने खळबळ माजली आहे. या घटनेचे गुढ उकलण्यासाठी पोलिस कसोशीने तपास करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात